आरोग्यमंत्री म्हणतात, आता महिलांना अविवाहित राहायला आवडतं!

लग्नानंतर मुलांना जन्म देण्याचीही त्यांची इच्छा नसते, असंही आरोग्यमंत्री म्हणाले आहेत.
आरोग्यमंत्री म्हणतात, आता महिलांना अविवाहित  राहायला आवडतं!
Modern Indian Womens

बेंगलुरू : कर्नाटकचे (Karnataka)आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर (K. Sudhakar) यांनी रविवारी अजब दावा केला आहे. आधनिक भारतीय महिलांना (Modern Indian Womens) आता एकटे राहायला आवडत आहे. लग्नानंतर मुलांना जन्म देण्याचीही त्यांची इच्छा नसते. सरोगसीच्या माध्यमातून मुलांना जन्म देण्याचा पर्याय निवडतात, असा दावा सुधाकर यांनी केला आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त (World Mental Health Day) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, आज मी माफी मागून सांगतो की, आधुनिक भारतीय महिलांच्या विचारात मोठा बदल होऊ लागला आहे. भारतीयांवर पाश्चिमात्य देशांचा प्रभाव वाडला आहे. आपले आई-वडील आपल्यासोबत राहावेत असं लोकांना वाटत नाही. दुर्दैवाने आपण पाश्चात्य देशांच्या मार्गाने पुढे जात आहोत. लोक आपल्यासोबत आजी-आजोबांना ठेवण्यास विसरले आहेत.

Modern Indian Womens
महाराष्ट्रासह देशावर ब्लॅकआऊटचे संकट; आता हे काम कराच!

भारतीय महिलांविषयी बोलताना सुधाकर म्हमाले की, आधुनिक भारतीय महिलांना पाश्चात्य देशांचा प्रभाव अधिक दिसतो. त्यामुळे त्यांना आता एकटेच राहावंसं वाटतं. त्यांना लग्नानंतर मुलं जन्माला घालण्याचीही इच्छा नसते. त्या सरोगसीचा पर्याच निवडतात, असं वक्तव्य सुधाकर यांनी केलं आहे.

Modern Indian Womens
डच्चू दिल्यानंतर वरूण गांधींचा विरोधी सूर; म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी...

सुधाकर म्हणाले, प्रत्येक सातव्या भारतीय व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारची मानसिक समस्या आहे. ही समस्या कमी, मध्यम किंवा गंभीर स्वरूपाची असू शकते. तणाव व्यवस्थापन एक कला आहे. योग, ध्यान, प्राणायाम हे त्यासाठीची चांगली माध्यमे आहेत. हजारो वर्षांपूर्वी आपल्या पुर्वजांनीच हे जगाला शिकवलं आहे. कोरोना काळात नातेवाईकांना आपल्या नातलगांच्या मृतदेहांना स्पर्शन करता आला नाही. त्यामुळेही अनेकांमध्ये मानसिक समस्या निर्माण झाल्याचेही सुधाकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.