जर त्यांना समजलं नाही तर तयारीत रहा! राज ठाकरेंनी दिला गंभीर इशारा

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मागील काही दिवसांपासून यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी ठाण्यात झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत तीन तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. त्याची पुन्हा एकदा आठवण करून देत त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीत राहण्याचे आदेश दिले. तसेच आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होणार असेल तर तुमच्या हातात जे हत्यार आहे ते आम्हालाही घ्यायला भाग पाडू नका, असा गंभीर इशारा ठाकरे यांनी दिला.

पुण्यात (Pune) रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. पाच जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच महाराष्ट्रदिनी एक मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली. हा धार्मिक विषय नसून सामाजिक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Raj Thackeray
अखेर राज ठाकरेंचा बहुप्रतिक्षित अयोध्या दौरा ठरला; केली मोठी घोषणा

राज ठाकरे म्हणाले, देशभरातील सर्वांनाच सांगणं आहे की, लोकांना वाटत आहे, भोंग्यांचा हा धार्मिक विषय आहे. पण हा सामाजिक विषय असून त्याकडे त्याच अंगाने पाहणे आवश्यक आहे. भोंग्यांचा मुस्लिमांसह सर्वांनाच त्रास होतो. त्यामुळे तुम्ही जर पाचवेळा तिथे भोंगे लावले तर आम्हीही दिवसांतून पाचवेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. तयारीत रहा. तीन तारखेपर्यंत जर त्यांना समजलं नाही, या देशातील कायद्यापेक्षा, न्यायव्यवस्थेपक्षा जर धर्म, लाऊडस्पीकर मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे, असा इशारा त्यांनी दिला.

मनसेची सर्वबाजूने तयारी सुरू आहे. देशात, महाराष्ट्रात आम्हाला दंगली नकोत. आमची इच्छाही नाही. मुस्लिम बांधवांनी याचा विचार करायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले. राज्यात ठिकठिकाणी मिरवणुकांदरम्यान झालेल्या हिंसाचारावर बोलताना ते म्हणाले, आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होणार असेल तर आम्हीही गप्प बसणार नाही. आम्ही हातात शस्त्र घेऊ शकतो. आमचे हात बांधलेले नाहीत, दगड आम्हालाही हातात घेता येतात. आम्हाला जे तुमच्या हातात हत्यार असेल ते हातात घ्यायला लावू नका, अस सांगत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्यांवरून आक्रमक भूमिका मांडली.

Raj Thackeray
कारवाई करण्यापूर्वी...! शौचालय घोटाळ्याबाबत सोमय्यांचं थेट प्रधान सचिवांना पत्र

दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात अयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. पण त्यावेळी त्यांनी तारीख सांगितली नव्हती. त्यानंतर शनिवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याच्या तारखेची घोषणा केली. अयोध्येला पाच जून रोजी पक्षातील सर्व सहकाऱ्यांसोत जाणार आहे. तिथे जाऊन दर्शन घेईन, असं राज ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com