राज ठाकरेंना भाजपच्या एका खासदाराचा विरोध, तर दुसरे खासदार स्वागतासाठी सज्ज

ब्रिजभूषण सिंग यांनी विरोध दर्शवला आहे, लल्लू सिंग यांनी राज ठाकरेंच्या स्वागताची तयारी केली आहे.
राज ठाकरेंना भाजपच्या एका खासदाराचा विरोध, तर दुसरे खासदार स्वागतासाठी सज्ज
Raj Thackeray Ayodhya Visit News, Raj Thackeray Ayodhya Toursarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पाच जूनला अयोद्धेला जाणार आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या नेत्यांकडून राज ठाकरेंच्या अयोद्धा दौर्‍यावर चर्चा होत आहेत. याबाबत भाजपमध्ये परस्पर विरोधी भूमिका पाहायला मिळत आहे. या दौऱ्याला उत्तरप्रदेशमधील भाजपच्या एका खासदाराचा विरोध आहे,तर भाजपच्या दुसऱ्या खासदारांनी राज ठाकरेंच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे. (Raj Thackeray Ayodhya Visit News)

भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग (MP Brij Bhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे भाजपचेच खासदार लल्लू सिंग (MP Lallu Singh) यांनी मात्र राज ठाकरेंच्या स्वागताची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या दोन खासदारांच्या भांडणात राज ठाकरे काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Raj Thackeray Ayodhya Visit News, Raj Thackeray Ayodhya Tour
काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीयमंत्री पंडित सुख राम यांचे निधन

"राज ठाकरेंनी किमान उत्तर प्रदेशच्या साधुमहंतांची माफी मागावी, साधुंनी राज ठाकरेंना माफ केल्यास आपणही माफ करू आणि अयोद्धा दौर्‍याचा मार्ग मोकळा करू," असं खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटलं आहे.तर दुसरीकडे "जर कोणी प्रभू श्रीरामांच्या पायी शरण येत असेल, त्यांच्या दर्शनासाठी येत असेल तर आम्ही एक अयोद्धा वासी म्हणून त्यांचं स्वागतच करू. आपण प्रार्थना करतो की श्रीराम प्रभू राज ठाकरेंना सद्बुद्धी देवो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत जाऊन त्यांनी महाराष्ट्राचे कल्याण करावे," असे लल्लू सिंग म्हणाले.

लल्लू सिंग म्हणाले, "हनुमानाची कृपा राज ठाकरेंवर झाली आहे, म्हणून ते आता प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोद्धेत येत असल्याचं लल्लू सिंग म्हणाले आहेत. आणि श्रीरामांच्या दर्शनासाठी येणार्‍यांचे स्वागत होईल ," लल्लू सिंग हे भाजपाचे फैजाबादचे खासदार आहेत. तर ब्रिजभूषण सिंग हे कैसरगंजचे खासदार आहेत. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत 'कारसेवकांनी' पाडलेल्या वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणात ब्रिजभूषण यांचे नाव आरोपींच्या यादीमध्ये होते.

गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे शहनवाझ हुसेन यांनी खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मार्फत ब्रिजभूषण यांची मनधरणी केली जात आहे का? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपण ब्रिजभूषण यांच्याशी बोलणी करणार नसल्याचं म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.