मी त्याला चालायला शिकवलं अन् तो मला तुडवत निघून गेला! शिवपाल यादवांच्या ट्विटनं खळबळ

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यातील संघर्ष वाढतच चालल्याचे चित्र आहे.
Shivpal Yadav, Akhilesh Yadav
Shivpal Yadav, Akhilesh YadavSarkarnama

लखनौ : समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि आणि त्यांचे काका शिवपाल यादव (Shivpal Yadav) यांच्यातील संघर्ष वाढतच चालल्याचे चित्र आहे. काका-पुतण्यांमधील या वादामुळे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) राजकारण तापलं आहे. शिवपाल यांनी मंगळवारी ट्विटरवरून रमजान ईदच्या शुभेच्छा देताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख अखिलेश यांच्याकडेच असल्याचे सांगितले जात आहे.

शिवपाल यादव यांनी मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षातून बाहेर पडत प्रगतीशील समाजवादी पक्षाची स्थापना केली. अखिलेश यांच्याशी असलेल्या वादामुळे ते पक्षातून बाहेर पडले होते. पण नंतरच्या निवडणुकीत त्यांनी एकत्र येत भाजपला टक्कर दिली. पण आता दोघांमधील संबंध अधिक ताणले गेल्याचे सांगितले जात आहे. शिवपाल यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेत तसेच सूचक संकेतही दिले होते. ते भाजपच्या जवळ गेल्याची चर्चा आहे.

Shivpal Yadav, Akhilesh Yadav
लग्नाला जाणं अजून तरी गुन्हा नाही! भाजपचे नेते तुटून पडताच काँग्रेसचा पलटवार

त्यातच शिवपाल यांनी मंगळवारी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'त्याला संतुष्ट करण्यासाठी सन्मानाचाही विचार केला नाही. पण त्यानंतरही मी नाराज असेन तर त्याने माझं मन किती दुखावलं असेल. मी त्याला चालायला शिकवलं आणि तो मला तुडवत निघून गेला. पुन्हा एकदा आत्मविश्वास व सहगळ्यांच्या सहकार्याने अप्रतिम शक्तीने ईदच्या शुभेच्छा.'

आझम खानही नाराज?

समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांच्यासह सपाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनीही अखिलेश यादव यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. अखिलेश यांना हटविण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेशात नवीन राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. शिवपाल यादव यांनी सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांची कारागृहात जाऊन नुकतीच भेट घेतली. त्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे. शिवपाल आणि आजम खान यांची भेट म्हणजे समाजवादी पक्षात फूट पडण्याची सुरुवात मानली जाते.

मुस्लिम नेता पक्षश्रेष्ठींवर का नाराज आहेत, ते पक्षापासून का लांब जात आहेत, याचा फायदा कुणाला होणार शिवपाल यादव उत्तरप्रदेशातील राजकारणाच नवीन पर्याय देतील का, असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत. ''अखिलेश यांना माझी अडचण वाटत असेल, तर आम्हाला पक्षातून काढून टाका,'' असे आव्हान शिवपाल यांनी काही दिवासापूर्वी दिले. त्यानंतर त्यांनी आझम खान यांची भेट घेण्यासाठी सीतापूर तुरुंगात गेले.या सर्व घटनांवर अखिलेश यांनी मैान बाळगले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com