MLA Gulab Singh Yadav Viral Video : आपच्या आमदाराला पक्ष कार्यकर्त्यांकडून मारहाण : भाजपचं टि्वट!

MLA Gulab Singh Yadav Viral video : पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप भाजपने केला आहे.
MLA Gulab Singh Yadav Viral video
MLA Gulab Singh Yadav Viral videoSarkarnama

दिल्ली : दिल्ली भाजपाने आम आदमी पार्टीच्या एका आमदाराचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. गुलाब सिंह यादव हे आपचे आमदार असून, त्यांचा हा व्हिडीओ असून ते आपल्या कार्यकर्यांना मारहाण करताना दिसत आहेत. दिल्लीमधील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपच्या बैठकीतलं हा प्रकार असल्याचं दिसून येतं

भाजपच्या संबंधित ट्विटर अकाऊंटवर व आणखी काही ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ ट्विट करण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये सिंह हे आपल्याच कार्यकर्त्यांशी वादविवा करताना दिसत आहेत. हा वादात जोरदार झगडा झालेला दिसून येतो. कार्यकर्ते हाणामारी करत, धक्काबुक्की देत, सिंह यांना कार्यालयाबाहेर बाहेर जायला भाग पाडत आहेत. यानंतर कार्यकर्त्यांनी सिंह यांचा पाठलाग केलं असल्याचे एका वृत्तवाहीनीने सांगिलतले आहे. आपला बचाव करण्यासाठी सिंह यांना पोलीस स्टेशनमध्ये जावे लागले.

MLA Gulab Singh Yadav Viral video
पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकांचा आज निकाल : कोण मारणार बाजी, भाजप की मविआ?

या व्हिडीओसोबतच सिंह यांनी पैसे घेऊन महानगरपालिकेच्या निवडणुकींसाठी पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप भाजपने केला आहे. "आम आदमी पक्षाचे आमदाराला कार्यकर्त्यांकडून मारहाण! आमदार गुलाब सिंह यादव यांना आपचे कार्यकर्ते तिकीटांचा व्यवहार करत आहेत म्हणून, या रागातून मारहाण केली.

मुख्यमंत्री केजरीवालजी अशाचप्रकारे आपच्या सर्व आमदारांचा नंबर लागेल,” असं दिल्ली भाजपाकडून ट्विट करण्यात आलं आहे. भाजपाच्या काही नेत्यांनीही हा व्हिडीओ ट्विट केलंय. राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा, तेजेंदर सिंग बग्गा आणि इतर नेत्यांनीही हा व्हिडीओ शेअर केला.

MLA Gulab Singh Yadav Viral video
पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकांचा आज निकाल : कोण मारणार बाजी, भाजप की मविआ?

यानंतर दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची दखल घेत, एक पत्र काढले आहे. गुलाब सिंह यादव यांना मारहाण झाली, अशी माहिती आज रात्री आठच्या दरम्यान मिळाली. महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या बाबीवरून हा राडा झाला. यामध्ये वादामुळे सिंह यांना त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी मारहाण केली.

दरम्यान सिंह यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावरून स्पष्ट झाले की, त्यांना कोणतीही इजा झाली नाही. याबाबत कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरु आहे,” असे दिल्ली पोलिसांनी म्हंटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com