काँग्रेस उमेदवारानं डिवचलं अन् आमदारानं खुनशीवर दहावी पास केली!

ते दहावीची राज्य मुक्तशाळा प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. दोन दशकांनंतर त्यांना दहावीत यश मिळालं आहे.
MLA clears Class 10 exam two decades after dropping out of school
MLA clears Class 10 exam two decades after dropping out of school

भुवनेश्वर : अनेकवेळा प्रयत्न करूनही दहावी उत्तीर्ण होता आले नाही. त्यामुळे शाळा तिथचं सुटली. जवळपास 20 वर्ष अशीच गेली. शिक्षण घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. राजकारणात बरं चाललं होतं, तीनवेळा आमदारकी मिळाली. पण याच राजकारणानं या आमदारांना दहावीची परीक्षा देण्यास भाग पाडलं. तेही निवडणुकीतील विरोधी पक्षाच्या उमेदवारानं डिवचल्यानं. (MLA Purna Chandra Swain clears Class 10 exam two decades after dropping out of school)

बीजेडीचे आमदार पुर्णा चंद्र स्वेन (Purna Chandra Swain) यांनी नुकतेच दहावीच्या परीक्षेत यश मिळवलं आहे. त्यांना 68 टक्के गुण मिळाले आहे. ते दहावीची राज्य मुक्त शाळा प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. दोन दशकांनंतर त्यांना दहावीत यश मिळालं आहे. प्रयत्न करूनही दहावीत उत्तीर्ण होत नसल्यानं त्यांनी 1997 मध्ये शाळा सोडून देत प्रवासी बसवर चालक म्हणून कामाला सुरूवात केली. त्यानंतर ते राजकारणाकडे वळले.

सध्या स्वेन हे बिजू जनता दलाचे आमदार आहेत. ही त्यांची तिसरी टर्म आहे. दहावीत उत्तीर्ण झाल्यानंतर स्टेन म्हणाले, शालेय शिक्षणही पूर्ण केलं नसल्यानं काँग्रेसचे विरोधी उमेदवार संग्राम मोहंती यांच्याकडून सातत्यानं टोमणे मारले जात होते. मी 2019 मध्ये त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा मला केवळ नववी पास असल्याचं बोलत डिवचलं. त्याचवेळी मी त्यांना दहावी उत्तीर्ण होऊन प्रत्यूत्तर देण्याचं ठरवलं, असं स्टेन यांनी स्पष्ट केलं.

स्वेन यांनी ओडिशातील मुक्त शाळेमध्ये 2016 मध्ये नोंदणी केली होती. या शाळेमध्ये दहावी अनुत्तीर्ण झालेल्या व शाळा सुटलेल्या विद्यार्थ्यांना थेट परीक्षा देण्याची संधी दिली जाते. पण कोरोनाची साथ आणि व्यस्त कार्यक्रमांनंतरही त्यांनी अभ्यासासाठी वेळ काढला. त्यांच्या मुलीनेही नुकतीच इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिने स्वेन यांना अभ्यासात मदत केली. 

आता इथंच न थांबता स्वेन यांनी इयत्ता अकरावीला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, शिक्षण घेणं खूप महत्वाचं असल्याचं मला माहित आहे. मला शिक्षणावरून कोणी बोलावं, असं अजिबात व्हायला नको, असं स्टेन यांनी सांगितलं. स्वेन यांना दहावीच्या परीक्षेत 500 पैकी 340 गुण मिळाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com