Amit Shah यांच्या सुरक्षाव्यवस्थेचे दाबे दणाणले ; सुरक्षा व्यवस्था भेदून एक तरुण त्यांच्यापर्यंत पोहोचला..

Amit Shah : अधिकाऱ्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हैदराबादच्या एका खासदाराचा पीए असल्याची बतावणी केली.
Amit Shah news update
Amit Shah news updatesarkarnama

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah)हे सोमवारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती जाहीर करण्यासाठी ते मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत ढिलाई झाल्याचे उघड झाले आहे.

आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याची बतावणी करत अमित शाह यांच्या आसापस एक तरुण फिरत होता. पोलिसांनी (mumbi police) या व्यक्तीला अखेर ताब्यात घेतले आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते.त्यांनी स्थानिक भाजपा नेत्यांसमोर मिशन 150चे लक्ष्य ठेवले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. मात्र या दौऱ्यात एक तरुण अमित शाह यांच्या आसपास फिरत असल्याचे पाहून मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला संशय आला.

अधिकाऱ्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हैदराबादच्या एका खासदाराचा पीए असल्याची बतावणी केली. त्यामुळे या अधिकाऱ्याचा संशय अधिकच बळावला आणि त्याने ही माहिती पोलिसांना दिली. हेमंत पवार असं या तरुणाचे नाव आहे. हा तरुण धुळ्यातील आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Amit Shah news update
Eknath Shinde : शिंदेचं मुख्यमंत्रीपद धोक्यात ? : उल्हास बापट यांचा गौप्यस्फोट

पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हेमंत पवार हा कशासाठी तिथे आला होता, अमित शहा यांच्याजवळ जाण्याचे कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहे.

पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाचा ब्लेझर घातलेल्या हेमंत पवारकडे खासदारांच्या पीएकडे असणारा पासही होता.केंद्रीय गृह मंत्रालय असे लिहिलेल्या रिबिनला त्याने हा पास जोडला होता. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेरही फिरताना आढळला होता. तो अमित शहा यांचे सुरक्षा कडे भेदून त्यांच्यापर्यंत कसा पोहोचला, त्यामागे त्याचा हेतू काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत. 32 वर्षीय हेमंत पवारकडे गृह मंत्रालयाचे ओळखपत्र होते, असे सांगितले जाते.

'शिवसेनेनं आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. राजकारणामध्ये धोका सहन करू नका. जे राजकारणात धोका देत असतात त्यांचं राजकारण यशस्वी होत नसतं. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे' असं म्हणत अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in