धक्कादायक : बलात्कार पीडितेची आरोपीसोबत धिंड अन् जमावाकडून 'भारत माता की जय'च्या घोषणा

बलात्कार पीडितेची आरोपीसोबतच धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशात घडला आहे.
minor rape victim beaten and paraded with accused in madhya pradesh
minor rape victim beaten and paraded with accused in madhya pradesh

भोपाळ : मध्य प्रदेशात एका अल्पवयीन बलात्कारपीडितेची चक्क आरोपीसोबत धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर झाला आहे. पीडित मुलीला मारहाण करुन  आरोपीसोबत दोरीने बांधून जमावाने त्या दोघांची धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या व्हिडीओत जमाव हा 'भारत माता की जय'च्या घोषणा देत असल्याचे दिसत आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. भोपाळपासून चारशे किलोमीटर अंतरावर असलेल्या अलिराजपूर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याचबरोबर जनतेत संतापाची भावनाही निर्माण झाली आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या कुटुंबीयांनीच तिला आरोपीसोबत चालण्यास भाग पाडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जाऊन पीडित मुलीची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेला पीडितेचे नातेवाईक तेवढेच जबाबदार असल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

या बलात्कार प्रकरणातील आरोपीने तो अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. तो 17 वर्षांचे असल्याचे सांगत आहे. पोलीस त्याच्या वयाची तपासणी करणार आहेत. असे असले तरी त्याचे आधी लग्न झाले असून, त्याला दोन अपत्येही आहेत. त्यामुळे अल्पवयीन असल्याच्या दाव्यावर शंका व्यक्त होत आहे. 

पोलिसांनी अटक केलेले पाचही आरोपी पीडित मुलीचे नातेवाईक आहेत. यात मुलीचे भाऊ, चुलत भाऊ आणि चुलत्यांचा समावेश आहे. पीडित मुलगी आणि आरोपी हे गुजरातमध्ये मजूर म्हणून काम करण्यासाठी गेले होते. ते काही दिवसांपूर्वी मूळ गावी परतले. त्यावेळी आरोपीने बलात्कार केल्याची माहिती पीडित मुलीने कुटुंबीयांना दिली होती. यानंतर त्यांनी पीडित मुलगी आणि आरोपीला रात्रभर मारहाण केली आणि सकाळी दोघांनी दोरीने एकत्र बांधून त्यांची धिंड काढली, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com