काँग्रेस, एमआयएम, टीआरएस नेत्यांच्या मुलांवर सामूहिक बलात्काराची तक्रार

मर्सिडीज कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये हायप्रोफाईल नावांचा समावेश असल्याचं समोर येत आहे.
काँग्रेस, एमआयएम, टीआरएस नेत्यांच्या मुलांवर सामूहिक बलात्काराची तक्रार
Hyderabad Gang Rape Case sarkarnama

नवी दिल्ली : तेलंगणाची (Telangana) राजधानी हैदराबादमध्ये (Hyderabad) मर्सिडीज कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये हायप्रोफाईल नावांचा समावेश असल्याचं समोर येत आहे.(Hyderabad Gang Rape Case)

या प्रकरणात तीन ते चार आरोपींचा समावेश असल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलं आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.अन्य आरोपींमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश आहे.

Hyderabad Gang Rape Case
अजितदादांनी अर्धवट माहितीच्या आधारे बोलू नये ; राज ठाकरेंवरील टीकेला मनसेचे प्रत्युत्तर

पार्टी आटोपून घरी परतत असलेल्या एका 17 वर्षीय मुलीवर मर्सिडीज कारमध्ये चार जणांनी सामूहिक बलात्कार (Rape) केला ती कार हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) जप्त केली आहे.

पीडित मुलीच्या वडीलांच्या पिर्यादीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Hyderabad Gang Rape Case
प्रत्येकवेळी हिंदूंनी गोळ्या खायच्या का ? संरक्षण देणे शक्य नसेल तर बंदुका द्या ; मनसे आक्रमक

या गुन्ह्यातील सर्व आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. हैदराबादच्या जुबली हिल्स (Jubilee Hills) परिसरात 28 मे रोजी हा गुन्हा घडला होता. पीडितेच्या कुटुंबीयांनी तीन दिवसांपूर्वी केलेल्या तक्रारीनंतर सुरुवातीला महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मुलीच्या मानेवर जखमेच्या खुणा पाहून कुटुंबीयांना संशय आला.

अल्पवयीन सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींमध्ये तीन राजकारण्यांच्या मुलांचा समावेश आहे. त्यापैकी एक एआयएमआयएम (AIMIM) नेत्याचा मुलगा आहे, दुसरा टीआरएस (TRS) नेत्याचा मुलगा आहे आणि तिसरा काँग्रेस (Congress) नेत्याचा मुलगा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या पीडितेने फक्त एका आरोपीची ओळख पटवून त्याचं नाव सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in