खाण घोटाळा प्रकरण: आयएएस अधिकाऱ्याच्या घरी सापडले 19 कोटींचे घबाड

Crime news| pooja singhal| पूजा सिंघल या झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात.
pooja singhal
pooja singhal

Mining scam case in jharkhand news

रांची : खाण घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) झारखंडच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि खाण, भूविज्ञान विभागाच्या सचिव पूजा सिंघल आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या जवळच्या व्यक्तींच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. या कारवाईत पूजा सिंघल (Puja Singhal) यांच्याकडे तब्बल 19.31 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पूजा सिंघल या झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. या कारवाईसोबतच एकाच वेळी झारखंडच्या रांची, खुंटी, राजस्थानच्या जयपूर, हरयाणाच्या फरिदाबाद व गुरुग्राममध्ये, प.बंगालच्या कोलकाता, बिहारच्या मुजफ्फरपूर व दिल्लीच्या एनसीआरमध्ये धाडी टाकण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

pooja singhal
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची ठाकरे सरकारनं कत्तल केलीय ; फडणवीस संतप्त

एएनआयने वृत्तसंस्था दिलेल्या वृत्तानुसार, तपास एजन्सीने छाप्यांमध्ये 19.31 कोटींची रोख रक्कम जप्त केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्याचे यंत्र मागवून पैशांची मोजणी केली. तसेच, रांची येथील पंचवटी रेसिडेन्सी, चांदणी चौक, कानके रोड, हरिओम टॉवर येथील नवीन इमारत, लालपूर, पल्स हॉस्पिटल, बरियातू येथील ब्लॉक क्रमांक 9 मध्ये छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानावरही छापे टाकल्याची माहिती आहे.

तर त्याचवेळी पूजा सिंघल यांचे सासरे कामेश्वर झा यांनाही बिहारमधील मधुबनी येथील घरातून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सिंघल यांचे सीए सुमन कुमार यांनी,17 कोटी रुपये रोख त्यांच्या मालकीचे असल्याचे मान्य केले आहे. त्यांना ही रक्कम पुढील आर्थिक वर्षात दाखवायचे होते. मात्र, एवढी मोठी रक्कम कुठून आणली आणि एवढी रक्कम घरात का ठेवली, अशा माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देऊ शकले नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पूजा सिंघल यांचे पती अभिषेक यांच्या घरावरही छापे टाकण्यात येत आहेत. आयएएस अधिकारी राहुल पुरवार यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर पूजा सिंघलने अभिषेक यांच्यासोबत दूसरे लग्न केले. आता ईडीचे अधिकारी अभिषेकच्या रातू रोडवरील एका ठिकाणीही तपास करत आहेत. ईडीने छापे टाकून अनेकांना ताब्यात घेतले आहे. जवळच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. धनबादमध्येही पथक अनेक ठिकाणी शोध घेत आहे.

यासोबतच मनरेगा घोटाळ्याच्या एका प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ईडीने संपूर्ण प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील मनरेगामध्ये 18.06 कोटी रुपयांचा घोटाळा झाला तेव्हा तेथे पूजा सिंघल उपायुक्तपदी होत्या अशी माहिती ईडीने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in