लाखो लोक बेघर; पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

Pakistan Emergency : 30 लाख लोक बेघर, अनेकांकडे दोन वेळेचं अन्नही नाही.
National Emergency
National EmergencySarkarnama

पाकिस्तान : पाकिस्तान (Pakistan) सरकारकडून त्यांच्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील अनेक प्रांतात अतिवृष्टीने भीषण पूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरामध्ये आतापर्यंत 937 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३४३ लहान बालकांचा देखील समावेश आहे. तर पाकीस्तानातील तब्बल 30 लाख लोक बेघर झाले आहेत. (Pakistan Emergency News)

पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सर्वात जास्त म्हणजे 306 जणांचा मृत्यू झालाची नोंद झाली आहे. 14 जूनपासून या भागामध्ये अनेकवेळा जोरदार पाऊस झाला असून अतिवृष्टीचे संकट ओढवले आहे. अनेक भागातील वेगवगेळ्या दुर्घटनांमध्ये शेकडो लोकांना मृत्यूमुखी पडावे लागले. ही आकडेवारी पाकिस्तानमधील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने या कालावधीमध्ये जाहीर केली आहे.

National Emergency
उद्धव ठाकरे सैराट मित्र मंडळ सुद्धा सोबत करतील ; निलेश राणेंची खोचक टीका

पाकिस्तानातील सिंध आणि बलुचिस्तान या भागाला सर्वाधिक अतिवृष्टीचा प्रादुर्भाव झाला आहे. सिंधमध्ये 784 टक्के तर बलुचिस्तानमध्ये 496 टक्के जास्त पाऊस पडल्याचं वृत्त पाकीस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिलं आहे. यात विशेषकरुन दक्षिण पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील 23 जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तीबाधित म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

National Emergency
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे विश्रांतीसाठी सहकुटुंब महाबळेश्वरात ....

या संकटाच्या पार्श्वभूमीवर मंत्री शेरी रेहमान यांनी पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये वॉर रुम सुरु करण्यात आल्याचं सांगितलं आहे. देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये मदत देण्याचं काम केलं जात आहे. ही अतिवृष्टी भीषण आहे. आम्हाला हेलिकॉप्टरने मदत पोहचवण्यात अडचणी येत असल्याचं, असे रेहमान म्हणाल्या आहेत.

मंत्री रेहमान यांनी या भीषण परिस्थितीची तुलना 2010 मध्ये आलेल्या पूरपरिस्थितीशी केली होती. मात्र आताची परिस्थिती तेव्हापेक्षाही अधिक भयानक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “2010 मध्ये फक्त उत्तरेकडून पाणी वाहत होते. मात्र यंदा पाण्याचा वेग अधिक असून त्यामुळे अधिक भूभागावर आपत्ती कोसळली आहे,”असं रेहमान म्हणाले. “जवळजवळ 30 लाख लोक बेघर झाले आहेत. हजारो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून अनेकांकडे दोन वेळेचं अन्नही नाही” अशीही माहिती रेहमान यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in