मिलींद नार्वेकरांचे राणेंना खिजवणारे ट्विट

Nitesh Rane | Milind Narvekar | नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Milind Narvekar - Narayan Rane - Nitesh Rane
Milind Narvekar - Narayan Rane - Nitesh Rane Sarkarnama

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) चांगलेच अडचणीत आले आहेत. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर (High Court) आता सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) राणेंना मोठा धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यासोबतच जिल्हा न्यायालयासमोर त्यांना शरण येण्यास १० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या धक्क्यानंतर अवघ्या ५ मिनिटांतच ट्विट करत शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांनी "लघु सुक्ष्म दिलासा" असं म्हणतं राणे कुटुंबियांची खिल्ली उडवली आहे.

त्यामुळे आमदार नितेश राणे यांना आता पुढच्या १० दिवसांमध्ये अटक होणार हे नक्की आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्या आदेशाला नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राणेंना राजकीय हेतूने अडकवण्यात आले आहे. त्यांना उच्च न्यायालयाने दिलेले संरक्षण दोनच दिवस बाकी राहिले आहे. त्यामुळे यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. यावर आज सुनावणी झाली. यात न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत त्यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास १० दिवसांचा कालावधी दिली आहे. (Supreme Court rejects Nitesh Rane bail plea)

Milind Narvekar - Narayan Rane - Nitesh Rane
धक्कादायक; सेना आमदाराला ED शी सेटलमेंट करण्याची ऑफर

मागील महिन्यात संतोष परब या शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात परब यांनी आपल्यावरील हल्ल्यासाठी नितेश राणे आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांना जबाबदार धरले होते. त्यानंतर मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते आता प्रकटले असून, सलग तीन दिवस ते कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत आहेत. काल (ता.२६) एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले होते की, पोलिसांच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करेन, असा शब्द मी आधीच दिला होता. त्यानुसार मी कणकवली पोलीस ठाण्यात हजर झालो. यापुढेही पोलिसांना माझी गरज लागेल, तेव्हा मी हजर होईन.

Milind Narvekar - Narayan Rane - Nitesh Rane
काँग्रेसच्या निलंबित माजी प्रदेशाध्यक्षांसाठी भाजपच्या पायघड्या; २ तासांमध्ये दिला प्रवेश

उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज १७ जानेवारीला फेटाळला होता. सुरवातीला राणे यांचा अटकपूर्व जामिनावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत कायम ठेवले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने राणेंना दिलासा न दिल्याने त्यांची अटक अटळ आहे. (Nitesh Rane Case Updates)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com