जेडीयू काँग्रेसमध्ये विलिन करा : नितीश कुमारांना कोणी दिला सल्ला?

Nitish kumar : नितीश कुमारांनी आपल्याला जेडीयू पक्षाचं नेतृत्व करण्यास सांगितले होते.
Nitish Kumar
Nitish Kumar Sarkarnama

पटना : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना प्रत्युत्तर देत, जोरदार सुनावले आहे. "किशोरांना आम्ही कधी निमंत्रण दिले नाही, मात्र ते स्वत:च आमच्याकडे आले होते. या लोकांचा कसलाही नेम नसतो, ते आता भाजपवासी झाले आहेत, त्याप्रमाणे त्यांचे काम सुरू आहे, " असे कुमार म्हणाले.

मागच्या काही दिवसांत प्रशांत किशोर यांच्या एका वक्तव्याची चर्चा होत होती. किशोर म्हणाले होते की, "नितीश कुमारांनी आपल्याला घरी बोलावले होते. त्यांच्या जेडूयू पक्षाचं नेतृत्व करण्यास मला सांगितले होते, परंतु या गोष्टीसाठी आपण नकार दर्शवला, असं खळबळजनक दावा किशोरांनी केले होते. आता यावर स्वत: मुख्यमंत्री नितीश कुमारांनी भाष्य केल्याने आता चर्चा होताना दिसून येत आहे.

Nitish Kumar
पवार चुलता-पुतण्याने राजकारणात मला २० वर्षे कोंडून ठेवले : शहाजी पाटलांचा गंभीर आरोप

नितीश कुमार पुढे म्हणाले की, “ज्यावेळी प्रशांत किशोर माझ्यासोबत कार्यरत होते, तेव्हा ते माझ्याच घरी वास्तव्यास होते. अशांबद्दल आता आम्ही काय टिपणी करावी? चार-पाच वर्षांपूर्वी एकदा ते माझ्याकडे आले आणि पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करा असे सुचवत होते, आम्ही काय आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा का?

Nitish Kumar
५६ टक्क्यांचा त्यांचा आकडा पहाटेचा, मध्यरात्रीचा की दुपारचा... शिवेंद्रसिंहराजेंचा सवाल

प्रशांत किशोर यांची जनसुराज्य पदयात्रा सुरू आहे. बिहारच्या चंपारण जिल्हा येथील भितिहरवा या गावातल्या महात्मा गांधी आश्रमातून पदयात्रेला सुरूवात झाली. भाजपाप्रणित सरकार उलटून बिहारमध्ये महागठबंधन सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रशांत किशोरांची सुरू झालेली पदयात्रा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. किशोरांनी सांगितले आहे की, त्यांचे पूर्ण संघटन हीएक अशी राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्नात आहे, जी एक व्यक्ती, एक कुटुंब किंवा विशिष्ट समूहापुरती मर्यादित नसेल. संपूर्ण आणि सकल समाजासाठी असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com