Meghalaya News : पोलिसांचा गोळीबार, 5 जणांचा मृत्यू : सात जिल्ह्यात इंटरनेट बंद!

Meghalaya News : पुन्हा आसाम आणि मेघालयात वाद पेट घेऊ शकतो.
Meghalaya News : पोलिसांचा गोळीबार, 5 जणांचा मृत्यू : सात जिल्ह्यात इंटरनेट बंद!

Meghalaya News : आसामच्या वनरक्षकांनी केलेल्या गोळीबारात मेघालयातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आसाम आणि मेघालयमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. मेघालयातील पश्चिम जयंतिया येथील मुक्रोह गावात ही घटना घडली. त्यामुळे यामुळे तणाव पसरला असून, 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद ठेवले गेले आहे.

Meghalaya News : पोलिसांचा गोळीबार, 5 जणांचा मृत्यू : सात जिल्ह्यात इंटरनेट बंद!
प्रकाश आंबेडकरांनी तळ ठोकला, काय असतील डावपेच?

मंगळवारी सकाळी साडेसात वाजता गावकरी छोट्या ट्रकमध्ये लाकडे भरून जंगलातून परतत असताना ही घटना घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आसामच्या वनरक्षकांनी ज्या भागात गोळीबार केला तो भागही मेघालयचाच आहे. या क्षेत्राबाबत आसाम आणि मेघालयमध्ये वाद सुरू आहे. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, आसाम वनरक्षकांनी वाहनांच्या टायरवर गोळ्या झाडल्या, ज्यामुळे वाहने अडकून पडली.

ट्रकचालक व लाकडे घेऊन येणाऱ्या ग्रामस्थांनी आरडाओरडा केला. त्यावर आजूबाजूच्या गावातील लोक जमा झाले. जमावाने घेरल्यानंतर वनरक्षकांनी गोळीबार केला, ज्यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या वृत्तानुसार, संतप्त गावकऱ्यांनी वनरक्षकांवरही हल्ला केला, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. अनेक वनरक्षक गंभीररित्या जखमी झाले आहेत. मेघालयाचे डेप्युटी आयजी डेव्हिस एनआर मारक यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. ही दुःखद घटना घडली असून, घटनास्थळी जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Meghalaya News : पोलिसांचा गोळीबार, 5 जणांचा मृत्यू : सात जिल्ह्यात इंटरनेट बंद!
Gujrat Election : गुजरात निवडणुकीबाबत केजरीवालांनी काँग्रेस आणि भाजपचं मांडलं गणित, 'आप'चं काय?

गोळीबाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत :

मिळालेली माहिती चिंताजनक असल्याचे डेव्हिस एनआर मारक यांनी सांगितले. मी घटनास्थळी जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ग्रामस्थ आणि वनरक्षक यांच्यात हाणामारी झाल्याचे दिसून येत आहे. वनरक्षक कसे रायफल घेऊन गोळीबार करत आहेत, हे एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. ते जमावाला घटनास्थळ सोडून गोळीबार करण्यास सांगतात. व्हिडिओमध्ये एक गावकरी म्हणतो की, या वनरक्षकांनी रायफल काढल्या आहेत आणि ते गोळीबार करू शकतात. काही सेकंदानंतर वनरक्षकांच्या बाजूने गोळीबार होतो. यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि काही लोकांना गोळ्याही लागल्या.

Meghalaya News : पोलिसांचा गोळीबार, 5 जणांचा मृत्यू : सात जिल्ह्यात इंटरनेट बंद!
Uday Samant News : राजन साळवींबाबत उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

पीडित कुटुंबाला ५ लाखांची मदत जाहीर, इंटरनेट बंद :

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली. मेघालयातील 7 जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. याशिवाय मेघालय सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याप्रकरणी मेघालय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in