मेघालयात आगडोंब; स्वातंत्र्यदिनी झालेल्या हिंसाचारानंतर राजधानीतील कर्फ्यू वाढला

हिंसाचारानंतर गृहमंत्री लहकमन रिम्बुई यांनी रविवारी राजीनामा दिला.
Meghalaya Govt orders inquiry of Cheristerfield Thangkhiew death
Meghalaya Govt orders inquiry of Cheristerfield Thangkhiew death

शिलाँग : ईशान्येकडील राज्यांतील तणाव कमी होताना दिसत नाही. मिझोराम व आसाम या दोन राज्यांत काही दिवसांपूर्वीच सीमावादावरून गोळीबाराची घटना घडली होती. यात पाच पोलिसांचा मृत्यू झाला होता. आता मेघालय हे राज्य धुमसत असून राजधानीत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनीच मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला. तर चार जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहे. त्यामुळं या जिल्ह्यात इंटरनेट सेवा सध्या बंद करण्यात आली आहे. (Meghalaya Govt orders inquiry of Cheristerfield Thangkhiew death)

मेघालयमध्ये नक्षलवादी नेता चेरिस्टरफील्ड थांगखियू (Cheristerfield Thangkhiew) याने काही दिवसांपूर्वीच पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रविवारी त्याचे शव दफन करण्यात आले. त्यानंतरच मेघालयातील अनेक भागांमध्ये हिंसाचार सुरू झाला. थांगखियू हा 2018 मध्ये शरण आला होता. पण नंतर त्याने आयईडी स्फोटकांचा वापर करून केलेल्या स्फोटांचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 

रविवारी स्वातंत्र्य दिनीच राज्यात मोठा आगडोंब उसळला. अनेक ठिकाणी तोडफोड व जाळपोळ करण्यात आल्याचं वृत्त आहे. सोमवारीही काही ठिकाणी हिंसाचार सुरू होता. रविवारपासून शिलाँगमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच चार जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरावर रविवारी रात्री पेट्रोल बाँब टाकण्यात आला. पण या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. 

यापार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत शिलाँगमधील कर्फ्यू बुधवारी पहाटे पाचपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इंटरनेट सेवाही 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच थांगखियू याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

ईस्ट खासी हिल्स, वेस्ट खासी हिल्स, साऊथ खासी हिल्स आणि री-भोई या जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद आहे. तसेच एसएमएस, व्हॉट्स अॅप, फेसबूक, ट्विटर आणि यूट्यूब आदी सोशल मीडियाव बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर गृहमंत्री लहकमन रिम्बुई यांनी रविवारी राजीनामा दिला. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणीही केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com