उशिरा का होईना, मोदींना शहाणपणा सुचला! राज्यपालांचा टोमणा

शेतकरी आंदोलनामुळे भाजपला उत्तर प्रदेशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसेल, असा इशारा राज्यपालांनी दिला होता.
उशिरा का होईना, मोदींना शहाणपणा सुचला! राज्यपालांचा टोमणा
Narendra Modi and Satyapal MalikSarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज कृषी कायद्यांवर यू-टर्न घेतला आहे. मागील वर्षभरापासून तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे मोदींनी हे कायदे मागे घेण्याचे जाहीर केले. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी यावरून मोदींनी टोमणा मारला आहे. त्यांनी आधीही उघडपणे शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले होते.

राज्यपाल मलिक हे मागील काही दिवसांपासून मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर उघडपणे टीका करीत आहेत. कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवरही त्यांनी सरकारला सुनावले होते. त्यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेचे स्वागत केले आहे. उशिरा का होईना मोदींना शहाणपणा सुचला, असा टोमणा त्यांनी मारला आहे. हे आधीच करायला हवे होते, अखेर मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करून इतिहास घडवल्याबद्दल मलिक यांनी शुभेच्छा दिल्या.

Narendra Modi and Satyapal Malik
राज्यपालांनी इशारा दिला अन् 24 तासांतच मोदी सरकारचा मोठा निर्णय

मलिक काल (ता.18) म्हणाले होते की, शेतकरी आंदोलनामुळे भाजपला उत्तर प्रदेशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसणार आहे. हे आंदोलन वर्षभर सुरू असून, आतापर्यंत यावर तोडगा निघायला हवा होता. नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये होते तेव्हा शेतकऱ्यांच्या हित पाहणारे होते. परंतु, आता देशाचा प्रवास अशा दिशेने सुरू आहे की शेतकऱ्यांशी चर्चाच बंद झाली आहे. आंदोलनात मृत्यू होणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल मोदींनी कधीही शोकसंदेश जाहीर केला नाही. यामुळे मला अतिशय त्रास झाला. शेतकरी येथून मोकळ्या हाताने उठून घरी जाणार नाहीत. त्यांनी 3-4 वर्षे राहावे लागले तरी ते येथे राहतील.

Narendra Modi and Satyapal Malik
कृषी कायद्यानंतर आता पडणार भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची विकेट?

राज्यपाल मलिक यांनी काल इशारा दिल्यानंतर 24 तासांतच आज मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला. पुढील वर्षाच्या सुरवातीला उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. या घटनेचा मोठा परिणाम आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून डॅमेज कंट्रोल मोहीम सुरू झाली आहे. यामुळे सत्यपाल मलिक यांचा इशारा सूचक मानला जात होता. अखेर मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेऊन शेतकरी आंदोलन शमवण्याचे पाऊल उचलले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in