रात्रीच्या अंधारात ममतांचा पॉलिटिकल स्ट्राईक, १२ काँग्रेस आमदार तृणमूलमध्ये

निवडणूक न लढवता तृणमूल काँग्रेस मेघालयमध्ये विरोधी पक्ष बनला आहे.
रात्रीच्या अंधारात ममतांचा पॉलिटिकल स्ट्राईक, १२ काँग्रेस आमदार तृणमूलमध्ये
Mamata Banerjeesarkarnama

शिलाँग (वृत्तसंस्था) : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी रात्रीच्या अंधारात मेघालयमध्ये काँग्रेसवर पॉलिटिकल स्ट्राईक केला आहे. माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह काँग्रेसच्या १८ पैकी १२ आमदारांनी पक्षाला सोटचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणूक न लढवताही तृणमूल काँग्रेस मेघालयमध्ये विरोधी पक्ष बनला आहे. ६० जागांच्या विधानसभेत नॅशनल पिपल्स पार्टीच्या नेतृत्वात ४० जागांसह एनडीएचे सरकार आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख विंसेट यांची मेघालयच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून पक्षातील वातावरण आलबेल नव्हते. पक्षाने विंसेट यांची नियुक्ती करण्याआधी आपल्यासोबत कोणत्याही प्रकारे चर्चा केली नसल्याचे मुकूल संगमा यांनी सांगितले होते. यानंतरच संगमा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र शनिवारी दोन्ही नेत्यांनी एकत्र येत आगामी निवडणुकीत हातात हात घालून काम करण्याची तयारी दर्शवली होती.

Mamata Banerjee
"२६/११ हल्ल्यात परमबीर सिंगानी दहशतवाद्यांना मदत केली, कसाबचा मोबाईलही गायब"

पण काल रात्री उशिरा संगमा आपल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रवेशाबद्दल माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आणि त्यांची टीम काँग्रेस आमदारांच्या संपर्कात होते. मात्र याआधी संगमा यांनी तृणमूल काँग्रेसला कोणताही शब्द दिला नव्हता. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटीसाठी वेळ मागितली होती. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी संगमा आणि विसेंट यांची भेट घेतली होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in