मायावतींचा मोठा निर्णय; राष्ट्रपती निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार

Presidential Election 2022| कॉंग्रेसबरोबर सत्तेत असलेल्या हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाचाही पाठिंबा मुर्मू यांना कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहे.
Presidential Election 2022|
Presidential Election 2022| Sarkarnama

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही आज पाठिंबा जाहीर केला. यामुळे मुर्मू यांचे पारडे आणखी जड झाले आहे. मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींंसह (Narendra Modi) भाजपचे सारे मुख्यमंत्री व एनडीए मित्रपक्षांचे नेते यांच्या भरगच्च उपस्थितीत काल (ता.२५) राज्यसभा सचिवालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉंग्रेस (Congress), तृणमूल कॉंग्रेस व द्रमुकसह विरोधकांनी ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

‘राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपला पक्ष मुर्मू यांना पाठिंबा देणार आहे‘, अशी घोषणा मायावती यांनी मायावती यांनी लखनौमध्ये केली. या निवडणुकीत यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने मुर्मूंना उमेदवारी देऊन ‘आदिवासी कार्ड' वापरल्याने पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षही बुचकळ्यात पडले आहेत.

Presidential Election 2022|
अखेर महाराष्ट्रातील राजकीय पेच पोहचला सर्वोच्च न्यायालयात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांना उमेदवारी देण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेसबरोबर सत्तेत असलेल्या हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाचाही पाठिंबा मुर्मू यांना कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहे. मुर्मू यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून लक्षणीय काम करताना तत्कालीन भाजप सरकारचे अनुसूचीत जमातींबाबतचे विधेयक माघारी पाठविल्याने त्या चर्चेत आल्या होत्या.

मायावतीं म्हणाल्या की, 'मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही ना भाजपच्या बाजूने घेतला आहे ना एनडीएच्या बाजूने, ना विरोधकांच्या. आमचा पक्ष आणि आंदोलने डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. नोटबंदीनंतर व उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणांत बसपाची शक्ती सध्या क्षीण झाली असली तरी पक्षाची दलित मतपेढी अजूनही लक्षणीय प्रमाणात कायम आहे.

या पक्षांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा ः

ओडिशा - बिजू जनता दल

तमिळनाडू- अण्णाद्रमुक

उत्तर प्रदेश- बसपा

बिहार - १- ‘हिंदुस्थानी अवाम मोर्चा

२ - लोकजनशक्ती पक्ष (रामविलास पासवान)

आंध्र प्रदेश - वायएसआर कॉंग्रेस

मेघालय - डेमोक्रॅटिक अलायन्स

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com