मध्यप्रदेशमध्ये खासगी रुग्णालयात मोठी आग; दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू

Madhya Pradesh | आग इतकी मोठी होती की आटोक्यात आणण्यासाठी वीज तोडणी करावी लागली...
Madhya Pradesh  Fire
Madhya Pradesh Fire Sarkarnama

जबलपूर : मध्य प्रदेशच्या जबलपूर शहरात एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला असून १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेले बहुतांश नागरिक रुग्णालयाचे कर्मचारी आहेत. अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून तासाभरात आग आटोक्यात आणली. सध्या मृतांची ओळख पटविणे सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. (Madhya Pradesh Hospital Fire)

आयसीयूत आज दुपारी अचानक लागलेल्यानंतर रुग्णालयात एकच धावपळ उडाली. रुग्णांना अन्य रुग्णालयात स्थानांतरित करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी प्रयत्न केले. या घटनेबद्दल मुख्यमंत्री शिवराज सिंह (Shivraj Singh Chauhan) यांनी शोक व्यक्त केला असून राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकारकडून केला जाईल, असेही त्यांनी ट्विटरवर जाहीर केले. (Massive fire broke out in a hospital in Madhya Pradesh’s Jabalpur)

याबाबत अधिक माहिती अशी की, जबलपूरच्या चंडालभाटा भागात न्यू लाइफ मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असून आयसीयू विभागात आज दुपारी अचानक आग लागली. रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असल्याने अनेक जण आतमध्येच अडकले. पाहता पाहता आग रुग्णालयात पसरली आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले.

आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल दहा बंबांना पाचारण करण्यात आले, परंतु आग कमी होत नव्हती. शेवटी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीज तोडल्यानंतर आग कमी झाली. या आगीत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण रुग्णालयात मृत्युमुखी पडले. तसेच दहापेक्षा अधिक गंभीररीत्या भाजले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in