नव्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अदर पूनावालांची सहा दिवसांपूर्वीच घेतली होती भेट - Mansukh Mandviya visited Serum Institute 6 days ago before taking charge | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

नव्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अदर पूनावालांची सहा दिवसांपूर्वीच घेतली होती भेट

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जुलै 2021

आशिया खंडातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गुजरातमधील मनसुख मांडवीय यांच्याकडे आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यापूर्वी त्यांच्याकडे रसायने व खते राज्यमंत्रीपद होतं. देश कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना मांडवीय यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. प्रामुख्याने कोरोना संसर्ग रोखण्याबरोबरच लशींचा पुरवठा यावर अधिक लक्ष्य द्यावं लागणार आहे. (Mansukh Mandviya visited Serum Institute 6 days ago before taking charge)

मांडवीय हे आरोग्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी सहा दिवसांपूर्वीच पुण्यात येऊन गेले आहेत. त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला ता. 2 जुलै रोजी भेट दिली. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawala) यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. पूनावाला यांनी लशीच्या उत्पादनासह पुरवठा व इतर माहिती त्यांना दिली. याच दिवशी दिवशी पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक प्रकल्पालाही भेट दिली होती. 

हेही वाचा : बंगालच्या फाळणीची मागणी करणाऱ्या खासदाराला मंत्रिपदाचे बक्षिस

मांडवीय यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली होती. लशींचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारकडून सर्वप्रकारे मदत केली जाईल, असं आश्वासन सिरमला दिल्याचे त्यांनी म्हटलं होतं. तसेच सिरमकडूनही याबाबतचं ट्विट करण्यात आलं होतं. पूनावाला व मांडवीय यांच्यात भारतातील लसीकरण उद्योग वाढविण्याबाबत चर्चा झाल्याचेही त्यात नमूद करण्यात आलं होतं. 

आता मांडवीय यांनी आरोग्य मंत्री म्हणून पदभार सांभाळल्यानंतर पूनावाला यांनी या भेटीची आठवण करून देत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्याकडे आशेने पाहत आहोत. सिरम संस्थेला दिलेल्या भेटीवेळी तुमच्याशी संवाद साधला आला, हे सन्मानाचे होते,' असं ट्विट पूनावाला यांनी केलं आहे. मांडवीय यांच्याकडे आधी रसायने व खते या खात्याचं राज्य मंत्रीपद होतं. आता या खात्याप्रमाणेच त्यांना आरोग्य खात्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. 

दरम्यान, सिरस इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे उत्पादन व वितरण केले जात आहे. भारतामध्ये सध्या या लशीचे सर्वाधिक डोस उपलब्ध आहेत. सिरमकडून आणखी दोन लशींचे उत्पादन केले जाणार आहे. अद्याप या लशींच्या चाचण्या सुरू आहेत. सिरमचा जगातील लशीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांमध्ये समावेश होतो. मागील काही महिन्यांपासून लशींची उत्पादन क्षमता वाढवली जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख