आजारावर मात करून माजी पंतप्रधान घरी पोचले अन् गुरशरण कौर म्हणाल्या...

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना 13 ऑक्टोबरला भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते.
Manmohan Singh and Gursharan Kaur
Manmohan Singh and Gursharan KaurSarkarnama

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांना 13 ऑक्टोबरला भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले होते. डॉ. सिंग यांना डेंगीची लागण झाली होती. अखेर 18 दिवसांनंतर डेंगीवर मात केल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यानंतर त्यांच्या पत्नी गुरशरणकौर यांनी कुटुबीयांच्या वतीने यावर निवेदन दिले आहे.

हृदयरोगतज्ञ डॉ.नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथक डॉ.सिंग यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. डॉ.सिंग यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्यांना काल (ता.३१ ऑक्टोबर) सायंकाळी एम्समधून घरी सोडण्यात आले होते. त्यांच्यावर एम्समध्ये १८ दिवस उपचार सुरू होते. डॉ.सिंग यांना ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना 13 ऑक्टोबरला तातडीने एम्समध्ये हलवण्यात आले होते. त्यांना डेंगीची लागण झाली होती. रुग्णालयातील कार्डिओ-न्युरो सेंटरमधील वॉर्डमध्ये डॉ.सिंग यांच्यावर उपचार सुरू होते.

कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात गुरशरणकौर म्हणाल्या आहेत की, आमच्या कुटुंबाच्या वतीने सगळ्यांना शुभचिंतकांना सांगण्यास आनंद होत आहे की, डॉ.मनमोनसिंग हे घरी परतले आहेत. ते आता डेंगीतून बरे झाले आहेत. एम्समधील सर्व डॉक्टर, परिचारिकास कर्मचाऱ्यांचे मी विशेष आभार मानते. याचबरोबर सर्व हितचिंतकांनी डॉ.सिंग यांच्या प्रकृतीबाबत केलेल्या प्रार्थनेसाठी त्यांचेही आभार.

Manmohan Singh and Gursharan Kaur
मोदी सरकारचा आता हॉटेलवाल्यांना दणका!

डॉ.सिंग यांना एम्समध्ये दाखल केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी 14 ऑक्टोबरला रुग्णालयाला भेट दिली होती. त्यांनी डॉ.सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत त्यांच्यावरील उपचारांचीही माहिती घेतली होती. त्यांच्या या भेटीवरून मोठा गदारोळ झाला होता. या भेटीचा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला फोटोही अखेर डिलिट करावा लागला होता. नंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही एम्समध्ये जाऊन डॉ.सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

Manmohan Singh and Gursharan Kaur
विधानसभा लढणार नाही! अखिलेश यादव यांच्या घोषणेने राजकीय भूकंप

डॉ. सिंग यांना याच वर्षी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत ते कोरोनाबाधित झाले होते. त्यांना 19 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते कोरोनाशी यशस्वी झुंज देऊन 29 एप्रिलला रुग्णालयातून बाहेर पडले होते. मागील वर्षी मे महिन्यात डॉ. सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर कार्डिओ थोरॅसिक विभागात उपचार सुरू होते. डॉ. सिंग यांच्यावर 2009 मध्ये ‘एम्स’मध्येच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉ.मनमोहनसिंग हे 89 वर्षांचे आहेत. ते राज्यसभा सदस्य आहेत. ते राजस्थानमधून राज्यसभेवर गेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com