Presidential Election : डॉ. मनमोहनसिंगांनी व्हीलचेअरवरून येत बजावले मतदानाचे कर्तव्य!

सिंग हे सध्या काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आहेत.
Dr. Manmohan Singh
Dr. Manmohan SinghANI

नवी दिल्ली : देशाचे सोळावे राष्ट्रपती निवडीसाठी आज देशभरातून मतदान होत आहे. सत्ताधारी लोकशाही आघाडीकडून (एनडीए NDA) माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या उभ्या असून त्यांना संयुक्त पुरोगामी आघाडीकडून (यूपीए UPA) माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) टक्कर देत आहेत. माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांनी व्हीलचेअरवर येत आपले मतदानाचे कर्तव्य बजावले आहे. (Manmohan Singh cast his vote for the presidency come on wheel chair)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत, त्यामुळे त्यांनी आज व्हीलचेअरवर संसदेत येऊन मतदान केले. सिंग हे सध्या काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आहेत. आजारी असतानाही त्यांना आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले आहे.

दरम्यान, द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील आणि महिला असल्याने त्यांना अनेक पक्षांकडून पाठिंबा दर्शविण्यात आलेला आहे, त्यामुळे जवळपास ६० टक्के मते त्या घेतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे यूपीएतील काही पक्षांनीही मुर्मू यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरीकडे भाजपबरोबर उभा दावा मांडलेल्या शिवसेनेनेही अखेर मुर्मू यांनाच मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dr. Manmohan Singh
Presidential Election : आघाडीची मतं फुटतील ; भाजपकडून संकेत

महाराष्ट्रातूनही मुर्मू यांना तब्बल २०० मते मिळतील, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदे म्हणाले की, शिवसेना, भाजप, शिंदे गट, अपक्ष आणि छोट्या पक्षाची तब्बल १८० ते २०० मते मुर्मू यांना मिळतील. लोकसभा आणि राज्यसभेतील शिवसेना आणि भाजपचे संख्याबळ तब्बल ५४ इतके आहे, त्यामुळे बहुतांश खासदारांचे समर्थन मुर्मू यांना मिळणार आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com