Manish Sisodiya Arrest :
Manish Sisodiya Arrest :sarkarnama

Manish Sisodiya Arrest : मोठी बातमी : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना अटक!

Manish Sisodiya Arrest : तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक..

Manish Sisodiya Arrest : कथित मद्य घोट्याळ्यामध्ये 'आप'चे नेते व दिल्ली सरकारमधील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अटक झाली आहे. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे. याप्रकरणामध्ये त्यांची या आधीही चौकशी झाली होती. आज त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या कारवाईची कुणकुण सिसोदिया आणि आम आदमी पक्षाला याआधीच लागली होती. अखेर सीबाआयाने त्यांना अटक केली आहे.

Manish Sisodiya Arrest :
Rahul Gandhi : भारत मातेने संदेश दिला अन् ..; राहुल गांधींची प्रांजळ कबुली

सीबीआयने सिसोदिया यांची 8 तास चौकशी केली. त्यानंतर काही वेळातच सिसोदिया यांना अटक करण्यात आली. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांची 8 तास चौकशी करण्यात आली. याआधीही सीबीआयने सिसोदिया यांची चौकशी केली होती. आज म्हणजेच रविवारी चौकशीपूर्वी मनीष सिसोदिया यांनी आपल्याला अटक होण्याची भीती व्यक्त केली होती. यासोबतच 7-8 महिने आतमध्ये जावे लागेल, अशी भीतीही सिसोदिया यांनी व्यक्त केली होती.

Manish Sisodiya Arrest :
RBI Restrictions : ‘या’ बॅंकांतून खातेदारांना पाच हजारांपर्यंत रक्कम काढता येणार, तीन बॅंकांतून पैसेच काढता येणार नाहीत : राज्यातील दोन बॅंकांचा समावेश

ज्या आम आदमी पक्षाने पारदर्शक कारभाराचे आश्वासन देवून, दिल्लीमध्ये सत्ता मिळवली. त्या पक्षाच्या नेत्यांना, उपमुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक होत आहे. दिल्ली सरकाराचं जे मद्य धोरण होतं, या धोरणात काही बदल करून ठराविक, विशिष्ट घटकाला फायदा मिळवून देण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे सगळं प्रकरण आता पुढील काळात वेगवेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com