CBI Raid : सिसोदिया यांची पंधरा तास चौकशी ; लॅपटॅाप, मोबाईल जप्त

Manish Sisodia : छापेमारीमध्ये सीबीआयने अनेक कागदपत्रे, फोन, लॅपटॅाप, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर बऱ्याच गोष्टी जप्त करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.
Manish Sisodia
Manish Sisodiasarkarnama

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री (Delhi Deputy CM) मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. काल त्यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या घरासह 21 ठिकाणी छापेमारी केली.

पंधरा तासाच्या चौकशीत त्यांच्याकडे अनेक महत्वाची कागदपत्रे आढळली आहेत. या छापेमारीमध्ये सीबीआयने अनेक कागदपत्रे, फोन, लॅपटॅाप, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर बऱ्याच गोष्टी जप्त करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.

सीबीआयने शुक्रवारी मनीष सिसोदिया यांच्या घराव्यतिरिक्त देशभरात अन्य ठिकाणी देखील छापेमारी केली. यामध्ये दिल्ली, मुंबई, गुरुग्राम, चंदीगढ, हैदराबाद, लखनऊ आणि बेंगळुरुसह इतर ठिकाणाचा समावेश आहे.

दिल्लीत ‘सीबीआय’ची कारवाई शुक्रवारी उशिरापर्यंत सुरू होती. सिसोदिया तसेच, अन्य अधिकाऱ्यांकडून जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे तपास केला जाणार आहे. त्यानंतर प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पैशांच्या अफरातफरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. या गुन्ह्यांचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) केला जाण्याची शक्यता आहे.

Manish Sisodia
दीड महिन्यांपूर्वी आम्ही ५० थरांची मोठी हंडी फोडली ; टेंभीनाक्यावरून मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

केजरीवाल सरकारने नोव्हेंबरमध्ये नवे उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. त्याअंतर्गत मद्यविक्रीचा परवाना खासगी ठेकेदारांना देण्यात आला होता. मात्र, हे धोरण ३० जुलै रोजी मागे घेण्यात आले. त्यानंतर या मद्यविक्री धोरणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात होता. दिल्लीच्या मुख्य सचिवांच्या अहवालानंतर नायब राज्यपाल विनय सक्सेना यांच्या आदेशानंतर या प्रकरणी ‘सीबीआय’ने सिसोदिया यांच्यासह १६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

नवे उत्पादन शुल्क धोरण निश्चित करणाऱ्या या विभागाच्या माजी आयुक्तांसह काही अधिकाऱ्यांच्या निवासस्थानीही छापे टाकण्यात आले. उत्पादन शुल्क विभाग उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अखत्यारित असल्याने त्यांच्या निवासस्थानी कारवाई करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com