मणिपूरमध्ये कॉग्रेसला झटका ; आदिवासी नेता भाजपच्या गळाला

मणिपूर भाजपमध्ये कॉग्रेसचा बडा नेता दाखल झाला आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात अनेकांनी आपल्या सोयीनुसार पक्ष बदलण्यास सुरवात केली आहे.
chaltonlien amo
chaltonlien amosarkarnama

नवी दिल्ली : पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. देशात 'आयाराम-गयाराम' सुरु असून मणिपूर भाजपमध्ये कॉग्रेसचा बडा नेता दाखल झाला आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात अनेकांनी आपल्या सोयीनुसार पक्ष बदलण्यास सुरवात केली आहे.

मणिपूरच्या तिपैमुख विधानसभेतील (manipur assembly elections) आदिवासींचे नेते, कॉग्रेसचे आमदार चाल्टनलियन एमो (mla chaltonlien amo) यांनी भाजपमध्ये (bjp) प्रवेश केला आहे. भाजपच्या मणीपूर प्रदेशाध्यक्ष ए. शारदा देवी यांच्या प्रमुख उपस्थित ६७ वर्षीय चाल्टनलियन एमो यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते कॉग्रेचे प्रदेशाध्यक्ष होते.

मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह, केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यावेळी उपस्थित होते. यादव आणि भैामिक हे दोन्ही भाजपचे केंद्रीयमंत्री आहेत. मणिपूरमध्ये भाजपचे रणनीती ठरविण्याची जबाबदारी या दोघांवर आहे.

प्रदेशाध्यक्ष ए. शारदा देवी म्हणाल्या, ''मणिपूर आणि पूर्वेत्तर राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या विकासाच्या धोरणावर विश्वास म्हणजे चाल्टनलियन एमो यांचा भाजपचा प्रवेश आहे,''

वनमंत्री भूपेंद्र यादव यांनीही टि्वट करीत एमो यांचे स्वागत केलं आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या धोरणामुळे मणिपूरच्या विकास वेगाने होत आहे. एमो यांच्या भाजपप्रवेशाने त्याला अजून गती मिळेल,'' यापूर्वी प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष गोविंददास कैांथैाजम यांच्यासह काही कॉग्रेसचे नेते, आमदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने नॅशनल पीपल पार्टी आणि अन्य काही सदस्यांच्या पाठिंब्याच्या आधारे एन बिरेंद्र सिंह यांना मुख्यमंत्री केले होते. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. ही सत्ता टिकवण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान आहे. तर भाजपला सत्तेपासून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत 21 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला इतर दुसऱ्या पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला होता. तर दुसरीकडे राज्यात 28 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला मात्र, विरोधात बसावे लागले होते.

chaltonlien amo
राष्ट्रवादीत येताच माझ्या मागे ईडी लावली ; ४० वर्ष तुमच्यासोबत चांगला होतो!

मणिपूर राज्यात जास्त काळ काँग्रेसचेच सरकार राहिले आहे. मात्र, 2017 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सत्तेची समीकरणे जुळवत मणिपूरमध्ये सत्ता स्थापन केली होती. मागच्या 5 वर्षात मणिपूरमध्ये हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात भाजपला यश मिळाल्याचा दावा गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च संपणार आहे. मणिपूर येथे साठा जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होत आहे. २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी येथे मतदान आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com