मी मुख्यमंत्री होणार हे आमदारांच्या बैठकीआधीच मला माहिती होतं!

भाजपने एका नेत्याला डच्चू देऊन काही तासांतच दुसरा मुख्यमंत्री बसवला
Manik Saha takes oath as CM
Manik Saha takes oath as CM Sarkarnama

आगरतळा : त्रिपुराच्या (Tripura) मुख्यमंत्रिपदाची शपथ डॉ.माणिक साहा (Manik Saha) यांनी घेतली आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष असलेले साहा मागील महिन्यातच राज्यसभेवर निवडून गेले होते. केवळ सहा वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या साहा यांना मुख्यमंत्रिपद दिल्यानं नाराजी उफाळून आली आहे. असं असलं तरी साहा यांना मात्र, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीआधीच ते मुख्यमंत्री होणार हे माहिती होतं. खुद्द साहा यांनीच याची कबुली दिली आहे.

विप्लवकुमार देव यांनी मुख्यमंत्रिपदाची राजीनामा दिल्यानंतर 4 वाजताच मी मुख्यमंत्री होणार हे मला कळालं होतं, असा दावा साहांनी केला आहे. विशेष म्हणजे, यानंतर दोन तासांनी आमदारांच्या बैठकीत साहा यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना साहा म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देव यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे देव यांच्यानंतर मुख्यमंत्रिपद मलाच मिळणार याची खात्री होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि विप्लव देव यांनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ही अतिशय मोठी जबाबदारी असून, ती मी काळजीपूर्वक पार पाडेन.

त्रिपुरात सत्तेत आल्यानंतर विप्लवकुमार देव (Biplab Kumar Deb) यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी 14 मे रोजी तडकाफडकी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून विनोद तावडे (Vinod Tawde) आणि भूपेंद्रकुमार यादव राज्यात दाखल झाले होते. यानंतर पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून डॉ. माणिक साहा यांच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं होतं. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर पक्षाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

Manik Saha takes oath as CM
प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळताच उपमुख्यमंत्री अन् मंत्र्याकडून बैठकीतच तोडफोड

त्रिपुरात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होत आहे. निवडणुकीला सुमारे वर्षभराचा कालावधी असतानाच मुख्यमंत्रिपदावरून देव यांना हटवण्यात आलं. राज्यातील भाजपमध्ये गटबाजी उफाळून आल्यानं पक्ष नेतृत्वानं हे पाऊल उचललं आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी देव यांना दिल्लीला पाचारण करण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. त्याचवेळी देव यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.

Manik Saha takes oath as CM
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना लॉटरी! आधी राज्यसभा अन् महिनाभरातच मुख्यमंत्र्यांची खुर्ची

खासदार डाॅ. साहा यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करुन भाजपने धक्कातंत्र वापरलं आहे. डाॅ. साहा मागील निवडणुकीनंतर भाजपशी जोडले गेले होते. ते मागील महिन्यात 3 तारखेला राज्यसभा खासदार बनले. यानंतर महिनाभरातच भाजप नेतृत्वाने त्यांची त्रिपुरात मुख्यमंत्री म्हणून निवड करण्याची खेळी खेळली आहे. कर्नाटक, उत्तराखंड, गुजरातप्रमाणे भाजपने त्रिपुरात रणनीती आखली आहे. याचबरोबर मंत्रिमंडळातही फेरबदल करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com