कोरोना लशीसाठी नाव नोंदवण्यास गेलेल्या ज्येष्ठाने रांगेतच सोडला प्राण

देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून, ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे.
man passed away covid19 vaccination registration centre queue in nalasopara
man passed away covid19 vaccination registration centre queue in nalasopara

मुंबई : देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे. कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदवण्यास गेलेल्या ज्येष्ठाचा लसीकरण केंद्रातील रांगेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मुंबईतील नालासोपारा येथील लसीकरण केंद्रावर घडली.  

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत आहेत. 

हरीश भाई पांचाल असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. ते 63 वर्षांचे होते. ते कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदवण्यास गेले होते. नालासोपाऱ्यातील लसीकरण नाव नोंदणी केंद्रावरील रांगेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती वसई विरार महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी सुरेखा वाळके यांनी दिली. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com