तुम्ही मला बंदूक दाखवाल तर तुम्हाला मी दारूगोळाच दाखवेन!

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले आहे.
mamta banerjee slams bjp and narendra modi over victoria memorial program
mamta banerjee slams bjp and narendra modi over victoria memorial program

कोलकता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्याने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त करीत त्यांचे भाषण थांबवले होते. या प्रकरणावर ममतांनी अखेर मौन सोडले आहे. त्यांनी कार्यक्रमातील गोंधळासाठी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरले आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ जयंतीनिमित्त 23 जानेवारील पश्चिम बंगालध्ये राजकीय मानापमान नाट्य रंगले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी झाल्या होत्या. त्या बोलत असताना उपस्थितांमधून जय श्रीरामची घोषणाबाजी झाल्याने त्या संतापल्या होत्या. पंतप्रधानांसमोरच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत भाषण थांबवले होते. 

यावर ममतांनी अखेर मौन सोडून भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते. मात्र, काही देशद्रोही पंतप्रधानांसमोरच माझी टिंगलटवाळी करीत होते. ते मला ओळखत नाहीत. तुम्ही मला बंदूक दाखवाल तर मी तुम्हाला दारूगोळा दाखवेन. परंतु, मी बंदुकीच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. 
तुम्ही नेताजींचा अपमान केला आहे. तुम्ही टागोरांच्या जन्मस्थानाचे नाव चुकवले. तुम्ही विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. बिरसा मुंडांच्या जागी तुम्ही चुकीच्या पुतळ्याला हार घातलात, अशा भाजपने आतापर्यंत केलेल्या चुकांचा पाढाच ममतांनी वाचून दाखवला.  

नेताजींच्या जयंतीनिमित्त कोलकत्यामध्ये पदयात्रा काढत ममतांनी भाजपवर निशाणा साधला होता. निवडणुका जवळ आल्याने भाजपला नेताजींची आठवण येत आहे, असा टोला त्यांनी लगावला होता. व्हिक्टोरिया मेमोरियलच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि ममता व्यासपीठावर एकत्र आले होते परंतु, दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणे टाळले होते. 

व्हिक्टोरिया ममोरियलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ममता या बोलण्यासाठी उभ्या राहिल्यानंतर त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, गर्दीतून जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या. यामुळे त्या संतापल्या होत्या. त्या म्हणाल्या  होत्या की, हा राजकीय कार्यक्रम नाही. सरकारी कार्यक्रमात शिष्टाचाराचे पालन व्हायला हवे. कोलकत्यात हा कार्यक्रम घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे मी आभार मानते. पण एखाद्याला व्यासपीठावर बोलावून त्याचा अपमान करणे शोभा देत नाही. याचा विरोध करत मी आणखी काही जास्त बोलणार नाही. जय हिंद, जय बांगला. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com