ममतांची आज मोदींसोबत खलबतं; पण त्याआधी सुब्रमण्यम स्वामींच्या भेटीला..

सुब्रमण्यम स्वामी हे भाजपमधील अत्यंत स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात.
ममतांची आज मोदींसोबत खलबतं; पण त्याआधी सुब्रमण्यम स्वामींच्या भेटीला..
Mamata Banerjee, Narendra Modi .jpgSarkarnama

दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कालपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून हा त्यांचा दूसरा दिल्ली दौरा आहे. कालच्या दिवसात किर्ती आझाद यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचे पक्षप्रवेश पार पडल्यानंतर ममता बॅनर्जी आज संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र सीमेपासून १५ किमीवरुन ५० किलोमीटर केले आहे, त्याबाबतचे विधेयक या अधिवेशनात येणार आहे. नेमका याच गोष्टीला ममतांचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे.

पण पंतप्रधानांच्या या भेटीआधी ममता बॅनर्जी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत नेमकी कोणती चर्चा होणार आहे, याबाबातची माहिती अजून समोर आलेली नसली तरी, या भेटीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दुपारी ३ वाजता ही भेट होणार आहे. स्वामी हे भाजपमधील अत्यंत स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात. ते पक्षांच्या धोरणांपासून ते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करताना भीड बाळगत नाही. त्यामुळे ममता-स्वामी भेटीत नेमके काय होते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

 Mamata Banerjee, Narendra Modi .jpg
भाजपच्या साथीने राष्ट्रवादीच्या सहकारमंत्र्यांनी उधळला गुलाल

ममता बॅनर्जी-पंतप्रधान भेटीत त्रिपूरामधील हिंसाचारावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी त्रिपूरामध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचे दावे करण्यात आले होते. याबाबतच्या चर्चांसाठी तृणमूलचे एक शिष्टमंडळ यापूर्वीच दिल्लीत पोहचले आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्थानकात घुसून त्यांना जबर मारहाण केली होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in