
Mamata Banerjee News : कर्नाटक विधानसभा निकाल जाहीर झाल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकींच्या चर्चांना उधाण आले आहे २०२४ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसला नमतं घ्यावे लागेल, असे विधान बँनर्जी यांनी केले होते. ज्या ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष मजबूत आहे तिथे काँग्रेसने कमी जागा लढवाव्यात,असे त्या म्हणाल्या होत्या.
ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, त्या ठिकाणी काँग्रेसने कमी जागा लढवाव्यात असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. काँग्रेसने 200 जागांवर निवडणूक लढवावी असे त्या म्हणाल्या होत्या. (Marathi Latest News)
ममता बॅनर्जी म्हणाल्या, आम्ही केलेल्या अंतर्गच विश्लेषणानुसार देशभरात 200 जागांवर काँग्रेसची स्थिती आल्यावर मजबूत आहे. या जागांवर आम्ही काँग्रेसला (Congress) पाठिंबा देवू, मात्र काँग्रेसेनही इतर राजकीय पक्षांनादेखील पाठींबा पक्षांना पाठिंबा दिला पाहिजे. आम्ही जर कर्नाटकमध्ये काँग्रेसला पाठिंबा देत असू तर काँग्रेसनेही बंगालमध्ये आम्हाला पाठिंबा द्यावा, असेही ममता म्हणाल्या
या महिन्याच्या शेवटास ममता या दिल्लीला जाणार आहेत. २७ मे रोजी होणाऱ्या निती आयोगाच्या बैठकीला त्या हजेरी लावणार आहेत. आपल्या दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान अजूनतरी बैठकचे कसलेही आयोजन करण्यात न आल्याचे त्यांनी सागितले.
ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भाजपच्या विरोधात सर्वांना एकत्रित यावं, असे आवाहन त्यांनी केलं आहे. भाजपला मतदान न करण्याची मोहीम चालवली जाईल, असेही त्या म्हणाल्या. जवळच असलेल्या छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये,राजस्थानच्या निवडणुकात भाजपचा पराभव घडणार असे त्या म्हणाल्या.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.