आता ममतांचे लक्ष्य महाराष्ट्रावर! ३० आणि १ तारखेला मुंबईत

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची भेटही घेणार
आता ममतांचे लक्ष्य महाराष्ट्रावर! ३० आणि १ तारखेला मुंबईत
Mamata Banerjee Sarkarnama

मुंबई : सध्या दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे लक्ष्य आता महाराष्ट्रावर आहे. येत्या ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी ममता एक्सप्रेस मुंबई धडकणार आहे. यावेळी त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेणार आहेत. त्यामुळे यात नेमकी काय चर्चा होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे.

ममता बॅनर्जी यांनी सध्या पक्षाच्या विस्तारवाढीचे धोरण स्विकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर तृणमूलने गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी लुईजिन्हो फालेरो यांच्यासारखे गोव्यातील अनेक मोठ्या नेत्यांना तृणमूलमध्ये आणले आहे. तसेच किर्ती आझाद यांच्यासारख्या काँग्रेसमधील अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचाही दिल्ली दौऱ्यात पक्ष प्रवेश करवून घेतला आहे.

Mamata Banerjee
रात्रीच्या अंधारात ममतांचा पॉलिटिकल स्ट्राईक, १२ काँग्रेस आमदार तृणमूलमध्ये

ममता यांनी काल रात्री मेघालयमध्येही काँग्रेसवर पॉलिटिकल स्ट्राईक केला आहे. माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह काँग्रेसच्या १८ पैकी १२ आमदारांनी पक्षाला सोटचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणूक न लढवताही तृणमूल काँग्रेस मेघालयमध्ये विरोधी पक्ष बनला आहे. ६० जागांच्या विधानसभेत नॅशनल पिपल्स पार्टीच्या नेतृत्वात ४० जागांसह एनडीएचे सरकार आहे. या सगळ्या घडामोडीनंतर ममता बॅनर्जी आता महाराष्ट्रात येत आहेत.

Mamata Banerjee
"२६/११ हल्ल्यात परमबीर सिंगानी दहशतवाद्यांना मदत केली, कसाबचा मोबाईलही गायब"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीही ममता बॅनर्जी महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच उद्धव ठाकरे यांच्यावर मान आणि पाठीचा मनका यावरील शस्त्रक्रिया पार पडली आहे. एकूणच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ममतांच्या महाराष्ट्र दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. नेमकी आता यात काय चर्चा होणार हे अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in