तर राज्यात पाच वर्षे पेट्रोल, डिझेल करमुक्त! मुख्यमंत्र्यांचं थेट मोदींना आव्हान

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून ममतांनी मोदींनी सुनावलं
Petrol and Diesel prices
Petrol and Diesel prices Sarkarnama

कोलकता : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. इंधन दरवाढीवरून ओरड सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आता थेट विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर राज्यांकडं बोट दाखवलं होत. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी थेट मोदींनाच आव्हान दिलं आहे. (Petrol Diesel price hike News)

पेट्रोल, डिझेल दरवाढीसाठी मोदींनी विरोधी पक्षांचेे सरकार असलेल्या राज्यांना जबाबदार धरल्याने आता राजकारण तापलं आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट मोदींनाच आव्हान दिलं आहे. त्या म्हणाल्या की, मोदींनी त्यांच्या 'ग्यान बाटो' संवादात काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पश्चिम बंगालचं तब्बल 97 हजार 807.91 कोटी रुपयांचं देणं केंद्र सरकारने दिलेलं नाही. हे कधी देणार याबद्दल मोदी काही बोलतील का? हे पैसे राज्याला देण्याची मोदी सरकारची काय योजना आहे? संघराज्य रचनेबद्दल बोलणारे मोदी हे लोकशाहीवर बुलडोझर चालवत आहेत. संघराज्य रचनेवर बोलणारे खरेतर ते शेवटचे व्यक्ती असायला हवेत. कारण ते विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांना भेदभावाची वागणूक देत असून, त्यांचे शोषण करीत आहेत.

Petrol and Diesel prices
सोमय्या पिता-पुत्रांची अटक दीड महिना टळली! उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे 97 हजार 807.91 कोटी रुपये दिल्यास पश्चिम बंगाल सरकार पुढील 5 वर्षे पेट्रोल, डिझेल करमुक्त करेल, असे आव्हान ममतांनी मोदींना दिलं. त्या म्हणाल्या की, पश्चिम बंगाल सरकार राज्यातील जनतेला फेब्रुवारी 2021 पासून प्रतिलिटर 1 रुपयांचा परतावा जनतेला देत आहे. जनतेवरील इंधन दरवाढीचा बोजा कमी करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले होते. आता पश्चिम बंगाल सरकारने वाहनांवरील पथकरातही 400 रुपयांची सवलत दिली आहे.

Petrol and Diesel prices
पेट्रोल, डिझेल कुणामुळं महाग? मुख्यमंत्री ठाकरेंनी मोदी सरकारला आकडेच दाखवले

मोदींनी काल (ता.27) सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यांनी वाढत्या पेट्रोल दरांचा मुद्दा उपस्थित केला. मोदींनी काही राज्यांतील पेट्रोल दरांचे उदाहरण दिले. यात महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांतील पेट्रोल दरांची तुलना त्यांनी भाजपशासित राज्यांतील दरांशी केली. ते म्हणाले होते की, जागतिक पातळीवर युद्धसदृश स्थिती आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे सर्वांनीच संघराज्य रचना लक्षात घेऊन सहकार्य करायला हवे. राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com