काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच खर्गेंनी मोदी-शहांच्या गुजरातमध्ये लक्ष घातले : १२५ उमेदवार केले निश्चित

येत्या शनिवारी (ता. २९ ऑक्टोबर) खर्गे हे गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeSarkarnama

नवी दिल्ली : मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाची (President) सूत्रे हाती घेताच पहिला निर्णय गुजरात (Gujrat) निवडणुकासंदर्भातील घेतला आहे. येत्या शनिवारी (ता. २९ ऑक्टोबर) खर्गे हे गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १२५ उमेदवाराांची नावं निश्चित केली आहेत. (Mallikarjun Kharge's 'Mission Gujarat' after taking over as Congress President)

तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाला निवडणुकीद्वारे अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जून खर्गे आणि शशी थरूर यांच्या लढतीत खर्गे यांनी मोठ्या मताधिक्क्यांनी बाजी मारली आहे. निवडून येऊन काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार हाती घेताच खर्गे हे तातडीने कामाला लागले आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी पक्षाची सुकाणू समिती जाहीर केली आहे.

Mallikarjun Kharge
त्यानंतर मी रामदास कदमांवर बोलायचे सोडून दिले आहे : आदित्य ठाकरेंचा हल्लोबाल

अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खर्गे यांनी येत्या २९ ऑक्टोबर रोजी गुजरात दौरा जाहीर आहे. त्यामुळे गुजरात विधानसभेची निवडणूक खर्गे यांनी मनावर घेतल्याचे दिसून येते. अध्यक्ष या नात्याने खर्गे यांनी आपला पहिलाच दौरा गुजरातमध्ये करत ‘मिशन गुजरात’ हाती घेतले आहे. दरम्यान, एका बैठकीत गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १२५ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत, त्यामुळे खर्गे गुजरातमध्ये काँग्रेसला ‘अच्छे दिन’ मिळवून देतील काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.

Mallikarjun Kharge
बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि हर्षवर्धन पाटलांचे जावई उतरणार राजकारणात

काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पहिल्याच दौऱ्यासाठी त्यांनी गुजरातची निवड केली आहे. खरं तर गुजरातमध्ये काँग्रेससमोर मोठं आव्हान आहे. ते भाजपबरोबरच आम आदमी पार्टीकडून या निवडणुकीत आव्हान उभं करण्यात आलं आहे. याशिवाय काँग्रेस पक्षाचे अनेक मोठे नेते पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे खर्गे कडवे आव्हान उभे करतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in