Mallikarjun Kharge : कॉंग्रेसनं कात टाकली ; नवी इनिंग सुरु, खर्गेंसमोर 'हे' मोठं आव्हान

Mallikarjun Kharge : येणाऱ्या निवडणूकीत कॉंग्रेस बाजी मारणार असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge sarkarnama

Mallikarjun Kharge : काँग्रेसला तब्बल २४ वर्षांनी बिगर गांधी कुटुंबातील अध्यक्ष मिळाला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची आज (बुधवारी) धुरा सांभाळली. त्यांनी आज पदभार स्वीकारला. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पक्षाची एकजूट करणं हे खर्गे यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे. Mallikarjun Kharge latest news)

मल्लिकार्जून खर्गे यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी सोनिया गांधी (Sonia Gandhi),राहुल गांधीसह (Rahul Gandhi),राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी,कॉंग्रेसचे अनेक बडे नेते उपस्थित होते. यानिमित्ताने दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर खर्गेंच्या अभिनंदनाचे पोस्टर लागले आहेत. कॉंग्रेससाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे.

तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी लागली. आतापर्यंत काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सहावेळा निवडणूक झाली आहे. यंदा, ही निवडणूक दुहेरी होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्या ही निवडणूक पार पडली. सर्वाधिक मतांनी मल्लिकार्जुन खर्गे यांने काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले.

Mallikarjun Kharge
Rashmi Shukla पुन्हा महाराष्ट्रात येणार ? ; शिंदे-फडणवीसांची मेहेरबानी, केंद्रात फिल्डिंग

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. विधानसभा,लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर काँग्रेसला आता कात टाकण्याची गरज असल्याचा सल्ला अनेक राजकीय तज्ज्ञांनी दिला. खर्गेंनी अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे पक्षाला नवी उभारी मिळेल, अशी आशा आहे. येणाऱ्या निवडणूकीत कॉंग्रेस बाजी मारणार असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. येणाऱ्या काळात कॉंग्रेस महिलांना संधी देईल, असेही समजते

कॉंग्रेसला पक्ष मजबूत करण्यासाठी काही अमूलाग्र बदल करणं अत्यंत महत्वाचं आहे. तरी मलिक्कार्जुन खरगेंच्या (Mallikarjun Kharge) हाती सूत्र आल्यानंतर ते कॉंग्रेस पक्षासह पक्षाच्या कार्यकारणीत काय बदल करणार याबाबत देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.

मल्लिकार्जून खर्गे समोर मोठं आव्हान

येत्या काही महिन्यात गुजरात (Gujarat), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) सारख्या मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Elaction) आहेत. तसेच कॉंग्रेसच्या हातात आता फक्त बोटावर मोजण्या इतक्या राज्यात सत्ता बाकी आहे. म्हणून या निवडणुकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत मोहिम फत्ते करणं हे कॉंग्रेस पूढील मोठं आणि महत्वाचं आव्हान असणार आहे. तरी आज अध्यक्ष पदाची सुत्र हातात घेतल्या नंतर कॉंग्रेस बाबतीत मलिक्कार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) काय मोठे निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com