मल्लिकार्जून खर्गे यांचा मोठा निर्णय; विरोधी पक्षनेतेपदाचा दिला राजीनामा

काँग्रेस हायकमांडसह पक्षातील विविध नेत्यांकडून मिळालेला पाठिंबा लक्षात घेता खर्गे हे काँग्रेस अध्यक्षपदाचे मजबूत दावेदार मानले जात आहेत.
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeSarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा (Leader of Opposition) राजीनामा (resigned) दिला आहे. काँग्रेस पक्षात ठरलेल्या ‘एक पद एक व्यक्ती’ या सूत्रानुसार खर्गे यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस हायकमांडसह पक्षातील विविध नेत्यांकडून मिळालेला पाठिंबा लक्षात घेता खर्गे हे काँग्रेस अध्यक्षपदाचे मजबूत दावेदार मानले जात आहेत. (Mallikarjun Kharge resigned from the post of Leader of Opposition in Rajya Sabha)

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांनी ३० सप्टेंबर रोजी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्षपदासाठी खर्गे यांच्यासह शशी थरूर, झारखंडचे माजी मंत्री के एन त्रिपाठी हे रिंगणात असणार आहेत. मात्र, या पदासाठी गांधी घराण्यासह पक्षातील बहुतांश नेत्यांचा खर्गे यांना पाठिंबा मिळालेला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे यांचे पारडे जड मानले जाते. अध्यक्षपदासाठी येत्या १७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून निकाल १९ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे.

Mallikarjun Kharge
‘अजितदादांच्या मनात काय, हे साहेबांनासुद्धा कळंलं नाही, त्यामुळे ते कधी झटका देतील सांगता येत नाही!’

‘एक पद-एक व्यक्ती’ या पक्षाच्या तत्वाप्रमाणे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आपण राजीनामा पाठविला आहे, असे मल्लिकार्जून खर्गे यांनी राजीनाम्यानंतर सांगितले. बंडखोर ‘जी-२३’ गटानेही खर्गे यांच्या पाठीशी आपले ताकद लावली आहे.

Mallikarjun Kharge
ZP Presidents Reservation : राज्यातील ३० ZP अध्यक्षांचे आरक्षण जाहीर; सोलापूर ओबीसी, तर पुणे खुले

दरम्यान, खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी नव्या नेत्याची नेमणूक करावी लागणार आहे. या पदासाठी काँग्रेसमधून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह, माजी वाणिज्य मंत्री जयराम रमेश यांची नावे चर्चेत आहेत. पण, काँग्रेस हायकमांड कोणाच्या नावावर मोहोर उमटवते, हे पाहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com