Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama

Congress : मतमोजणी सुरू असतानाच राहुल गांधींनी खर्गेंच्या विजयाचे दिले होते संकेत..

Congress : यापूर्वी सीताराम केसरी हे गांधी घराण्याबाहेरचे काँग्रेसचे अध्यक्ष होते, जे गांधी घराण्यातील नव्हते.

नवी दिल्ली : मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. मल्लिकार्जुन खरगे (mallikarjun kharge) यांना 7897 हून अधिक मते मिळाली असून, शशी थरूर यांना 1072 मतांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत सोमवारी मतदान झाले. काँग्रेस पक्षाला तब्बल 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. (mallikarjun kharge new president of congress news update)

यावेळी गांधी घराण्यातील एकही सदस्य अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील झाला नव्हता. गेल्या 24 वर्षांत पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरचा नेता काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाला आहे. यापूर्वी सीताराम केसरी हे गांधी घराण्याबाहेरचे काँग्रेसचे अध्यक्ष होते, जे गांधी घराण्यातील नव्हते.

सोमवारी यासाठी मतदान झाले होते, आज (बुधवारी) मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली निवडणुकीसाठी देशभरातील सर्व राज्य काँग्रेस समित्यांकडे मतपेट्या पाठवण्यात आल्या होत्या. त्यांना नवी दिल्लीतील 24 अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात (AICC) आणण्यात आले. या ठिकाणी सर्व मतांची मोजणी झाली.

मतमोजणी सुरू असतानाच राहुल गांधी यांनी पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार हे सांगितले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान आंध्रमधील पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले, "आता माझी भूमिकाही खर्गेजीच ठरवतील,"

Rahul Gandhi
Congress President : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे ; 24 वर्षांनंतर गांधी परिवाराच्या बाहेरील अध्यक्ष

या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांचा जवळपास 7 हजार मतांनी पराभव केला. खर्गे यांना 7 हजार 897 मते मिळाली. त्याचवेळी शशी थरूर यांना केवळ 1 हजार 72 मते मिळवता आली. 416 मते नाकारण्यात आली.

यावेळी गांधी घराण्यातील एकही सदस्य अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील झाला नव्हता. गेल्या 24 वर्षांत पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरचा नेता काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाला आहे. यापूर्वी सीताराम केसरी हे गांधी घराण्याबाहेरचे काँग्रेसचे अध्यक्ष होते, जे गांधी घराण्यातील नव्हते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com