मस्क यांनी ट्विटर विकत घेताच गडकरींनीही दिली खास 'ऑफर'

Elon Musk | Nitin Gadkari | Tesla : एलॉन मस्क यांनी ऑफर देवून ट्विटर खरेदी केले आहे. आता गडकरींनी मस्क यांना ऑफर दिली आहे.
Elon Musk | Nitin Gadkari |
Elon Musk | Nitin Gadkari |Sarkarnama

नवी दिल्ली : टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अखेर ट्विटरची मालकी मिळवली आहे. मस्क यांनी तब्बल ३ लाख ३६ हजार ९२७ कोटी रुपयांमध्ये ट्विटर (Twitter) खरेदी केले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करुन याबाबतची ट्विटरला ऑफर दिली होती.

मात्र आता याच मस्क यांना आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक जाहिर ऑफर दिली आहे. नितीन गडकरी यांनी टेस्लाला भारतात येवून गाड्या बनविण्याची खास ऑफर दिली आहे. तसेच त्यांना भारत दौऱ्यावर येण्याचेही निमंत्रण दिले आहे. रायसिना परिषदेत बोलताना गडकरी म्हणाले, जर एलॉन मस्क भारतात येवून टेस्ला' बनवू इच्छितात तर त्यांना त्यात कोणतीही अडचण येणार नाही.

आपल्याकडे सर्व क्षमता आहेत. सर्व प्रकराचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना उत्पादन खर्च कमी येवू शकतो. तसेच भारतात एक मोठे मार्केट उपलब्ध आहे. इथे बंदर देखील आहेत. ते भारतातून मोठ्या प्रमाणावर निर्यात करु शकतात. त्यांना विनंती आहे की त्यांनी भारतात येवून उत्पादन सुरु करावे. यावेळी बोलताना गडकरी यांनी भारतात मेड इन चायना टेस्ला येणार नसल्याचेही स्पष्ट केले.

दरम्यान मागील अनेक दिवसांपासून मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला भारतीय बाजारात पदार्पण करण्याचा विचार करत आहे. कंपनी त्यासाठी सरकारडून इलेक्ट्रिक आयात गाड्यांवरील १०० टक्के करात कपात मागत आहे. (Tesla Tax Break Demand) मात्र भारत सरकारकडून ही मागणी नाकारण्यात आली आहे. भारत सरकार आयात करण्यापेक्षा भारतात येवून उत्पादन करावे यासाठी आग्रही आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in