मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या लग्नात पोलीस दारू पिऊन धुंद तर कमांडो मोबाईलमध्ये गुंग

विवाह सोहळ्यात सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता आणि अनेक पोलीस अधिकारी दारू पिऊन धुंद असल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या लग्नात पोलीस दारू पिऊन धुंद तर कमांडो मोबाईलमध्ये गुंग
Wedding of Charanjit Singh Channi son Navjit Singh File Photo

मोहाली : पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjitsingh Channi) यांचे पुत्र नवजीतसिंग यांचा विवाह नुकताच झाला. मोहालीच्या गुरुद्वारामध्ये हा विवाह झाला. हा विवाह सोहळा आता वेगळ्याच कारणासाठी गाजू लागला आहे. या सोहळ्यात सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता आणि अनेक पोलीस अधिकारी दारू पिऊन धुंद असल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रातून या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र पाठवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विवाह सोहळ्यात साध्या वेशात बंदोबस्तावर असलेले अनेक पोलीस दारु पिऊन धुंद झाले होते. याचवेळी कमांडो हे मोबाईलवर व्हिडीओ पाहण्यात गुंतले होते. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही गायब झाले होते.

Wedding of Charanjit Singh Channi son Navjit Singh
पंजाब पुन्हा तापलं; मुख्यमंत्री चन्नींनी घेतली थेट कॅप्टनच्या घरी धाव

कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या. अनेक सुरक्षा कर्मचारी थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी आतमध्ये पोचले होते. यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्यांची तपासणी केली जात नव्हती. संगीत कार्यक्रमाच्या ठिकाणीही सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या. तेथे बंदोबस्ताला असलेल्या महिला पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष संगीतमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या खाण्यापिण्यात गुंतल्या होत्या. काही पोलीस अधिकारी मंत्र्यांच्या पाया पडतानाही दिसले. मुख्यमंत्र्यांची सुरक्षेची जबाबदारी असलेले कमांडो हे मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहण्यात गुंग होते. कुणीही कार्यक्रमाच्या ठिकाणी व्हीआयपी असल्याचे सांगून थेट प्रवेश करीत होता, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्रात म्हटले आहे.

Wedding of Charanjit Singh Channi son Navjit Singh
आनंदराव अडसुळांना न्यायालयाचा दणका; अडचणीत आणखी वाढ

मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचे पुत्र नवजीतसिंग याचा विवाह सिमरनधीरकौर यांच्यासोबत 10 ऑक्टोबरला झाला. या सोहळ्यासाठी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदारही उपस्थित होते. मात्र या सगळ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अनुपस्थितीची. या अनुपस्थितीमुळे चन्नी आणि सिद्ध् यांच्यात अजूनही मतभेद असल्याच्या चर्चा चालू होत्या. या चर्चांवर स्वत: सिद्धू यांनीच पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होते. सिद्धू हे लखीमपूर खीरीहून परत घरी येण्याऐवजी अचानक वैष्णव देवीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. सिद्धू यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती.

Related Stories

No stories found.