कोरोनाची चौथी लाट? चीनमध्ये प्रमुख शहरांत पुन्हा कडक लॉकडाऊन

चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे.
China Lockdown News, China Covid Wave News, 4th wave, 4th Wave News
China Lockdown News, China Covid Wave News, 4th wave, 4th Wave NewsSarkarnama

बीजिंग : चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा (Covid-19) संसर्ग वेगाने वाढू लागल्याने चीनमधील प्रमुख शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. चीनमध्ये 24 तासांत रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. पुन्हा एकदा जगावर कोरोनाचे संकट घोंघावू लागले असून, ही कोरोनाची चौथी लाट असल्याचा धोका व्यक्त होत आहे. (China Covid Wave News updates)

चीनमधील शेझेंन आणि शांघाय या मोठ्या शहरात कोरोनाविषयक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. चीनमध्ये शनिवारी रुग्णसंख्या 1 हजार 524 होती. ती 24 तासांत दुपटीने वाढून 3 हजार 122 वर पोचली आहे. कोरोना संसर्गाचे हे प्रमाण मागील दोन वर्षातील अधिक तीव्र आहे. यामुळे प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांनी घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. सर्व प्रौढांना तीन पीसीआर चाचण्या करण्यास सांगितले आहे. शांघायमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला असून, शहरातील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

मागील आठवडाभरात देशातील रोजची सरासरी रुग्णसंख्या आता 1 हजार 370 वर पोचली आहे. रॅपिड अँटिजेन चाचणीचे किट सार्वजनिकरीत्या वापरासाठी उपलब्ध करून देणे आणि आरोग्य यंत्रणांचे सुस्तावलेले वरिष्ठ अधिकारी यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा दावा करणयात आला आहे. शेंझेनमध्ये एका आठवड्याचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. संपूर्ण लॉकडाऊन टाळावे, अशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात येत आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला धोका बसण्याची शक्यता आहे. असे असले तरी निर्बंध लादणाऱ्या शहरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

China Lockdown News, China Covid Wave News, 4th wave, 4th Wave News
राजकारण तापलं! भाजपमधील कुणालाही न सांगता राणे थेट राज्यपालांच्या भेटीला

हाँगकाँगमध्ये परिस्थिती बिघडली

चीनने झिरो कोविड पॉलिसी अंगिकारली आहे. यानुसार एक रुग्ण सापडल्यासही मोठी खबरदारी घेऊन त्याचे विलगीकरण केले जात आहे. दरम्यान, चीनचा स्वायत्त भाग असलेल्या हाँगकाँगमध्ये परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. हाँगकाँगमध्ये सुमारे 3 लाख रुग्ण असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळे सध्या घरीच विलगीकरणात आहेत. देशात रुगसंख्या वेगाने वाढू लागल्याने सरकार धास्तावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com