महेश मोतेवारविरुद्ध कारवाईचा फास आवळला, ५ आलिशान गाड्या जप्त

समृद्ध जीवनच्या माध्यमातुन महेश मोतेवार (Mahesh Motewar) व त्याच्या साथीदारांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील शेतकरी व गुंतवणुकदारांची फसणूक केली होती.
branded cars
branded carsSarkarnama

पुणे : 'समृद्ध जीवन (Samruddh Jivan) आर्थिक घोटाळा' प्रकरणातील मुख्य आरोपी महेश मोतेवार (Mahesh Motewar) कारवाई फास आवळला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण (CID) विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोतेवारच्या ५ आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. यामध्ये मिनी कूपर, पजेरो, मायक्रा, स्विफ्ट डिझायर अशा गाड्याचा समावेश आहे. काही दिवसांपुर्वीच मोतेवारने श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंडळ ट्रस्टच्या मुर्तीला अर्पण केलेला ५० ते ६० लाख रुपये किंमतीचा सोन्याचा हार "सीआयडी'ने जप्त केला होता.

शेतीला पुरक व्यावसाय म्हणून शेळीपालन व अन्य व्यावसायाची जोड देत त्यातुन मोठा आर्थिक फायदा मिळण्याचे आमिष दाखवत समृद्ध जीवनच्या माध्यमातुन महेश मोतेवार व त्याच्या साथीदारांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील शेतकरी व गुंतवणुकदारांची फसणूक केली होती. जवळपास ४ हजार कोटी रुपयांची व्यापकता असलेल्या आर्थिक घोटाळ्यांवरुन महेश मोतेवारविरुद्ध २२ राज्यात २८ गुन्हे दाखल आहेत. राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या या घोटाळ्याचा तपास काही वर्षांपुर्वी "सीआयडी'कडे आला आहे.

"सीआयडी'च्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधिक्षक मनीषा धामणे पाटील यांच्याकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. त्यानुसार, १ जुलै रोजी धामणे यांच्या नेतृत्वातील पथकाने नऱ्हेमधील समृद्ध जीवन पार्कइथे छापा टाकून या घोटाळा प्रकरणातील दुसरीकडे हलविण्यात येणारी महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. तेथे पोलिसांना १ दुकान व तब्बल २ सदनिका भरुन ठेवलेली कागदपत्रे आढळली होती. त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी त्यांच्या पथकाने दूसरा छापा टाकला. तिथे सदनिका भरून कागदपत्रे आढळली होती.

त्यानंतर मागच्या १५ दिवसांपासून पथकाने मोतेवारच्या आलिशान गाड्या जप्त करण्यावर भर दिला होता. त्यानुसार आधी धनकवडीमधील बंगल्यातुन ३ गाड्या जप्त केल्या, त्यानंतर एजंटकडे असणाऱ्या २ गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, 'काही एजंट व काही व्यक्तींकडे मोतेवारच्या नावाने ४० ते ५० आलिशान व महागड्या आहेत. या गाड्याचा वापर संबंधित व्यक्तिकडून आजही सुरु आहे. मात्र या गाड्या संबंधित प्रकरणाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होऊ शकते, त्यामुळे गाड्या वापरणाऱ्यांनी स्वत: "सीआयडी"ला माहिती दिल्यास त्यांना मदत होऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com