रियाला सुशांतसोबतचं नातं तोडण्याचा सल्ला 'यांनी' दिला.. 

8 जूनच्या रात्री 7.43 ते 8.08 या दरम्यानचा आहे. याच दिवशी रिया चक्रवर्ती सुशांतसिंह याचं घर सोडून गेली होती.
4Rhea_F.jpg
4Rhea_F.jpg

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी मुंबईमध्ये पोहचले आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्यातील व्हॅाटस्अॅपवरील संवाद प्रसारमाध्यमात व्हायरल झाला आहे. हा संवाद सुशांतच्या मृत्यूपूर्वी सहा दिवस अगोदरचा म्हणजे 8 जूनच्या रात्री 7.43 ते 8.08 या दरम्यानचा आहे. याच दिवशी रिया चक्रवर्ती सुशांतसिंह याचं घर सोडून गेली होती. या व्हॅाटस्अॅप चॅटिंगमध्ये महेश भट्ट यांनी रियाला सुशांतसोबतचं नातं तोडण्याचा सल्ला दिला होता.  

याबाबत इंडिया टुडेमध्ये लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्यातील हा व्हॅाटस्अॅप संवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे. महेश भट्ट दिग्दर्शित 'जलेबी' या सिनेमाविषयी यात उल्लेख करण्यात आला आहे. या संवादात रिया महेश भट्ट यांना आपला देवता मानत असल्याचा उल्लेख आहे. सुशांत हा मानसिक आजारी असल्याचे रियाने काही जणांना सांगितलं असल्याचं या लेखात म्हटलं आहे. तर सुशांतसोबतचं नातं संपविण्याचा सल्ला महेश भट्ट यांनी रियाला दिला असल्याचे नमूद केले आहे. 

दरम्यान, रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिस आणि ईडीच्या चौकशीमध्ये सांगितलं आहे की सुशांतने तिला त्याचं घर सोडण्यास सांगितलं होतं. कारण तिचे वडील सुशांतसोबतच्या नात्याबाबत नाराज होते. 8 जून रोजी झालेल्या घटनेबाबत रिया आणि सुशांतच्या कुंटुबियांकडून वेगवेगळी माहिती समोर येत आहे.  सुशांतची बहीण मीतूच्या मतानुसार रियाने तिला फोन करून प्लॅटवर बोलविले होते. मीतू ज्यावेळी प्लॅटवर पोहचली तेव्हा रिया येथून निघून गेली होती. सुशांतसोबत आपलं भांडण झाल्याचे रियाने मीतूला सांगितलं होतं. सुशांतनेही दोघांमधील भांडणाबाबत सांगितलं होतं. मीतूच्या म्हणण्यानुसार ती सुशांतसोबत 12 जूनपर्यंत होती. त्यानंतर ती घरी गेली.

रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानशिंदे यांनी दावा केला आहे की मृत्यूच्या पूर्वी सुशांत खूप चिंतेत होता. तो सारखा रडत होता. आपल्या परिवाराला आपल्या सोबत राहण्यास बोलवत होता. त्यामुळे 8 जून रोजी त्यांची मोठी बहिण मीतू ही त्यांच्याकडे राहण्यास आली. त्यानंतर सुशांतने रियाला तिच्या घऱी पाठवून दिलं. 

बाॅलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 'सीबीआय'ने एका अज्ञात व्यक्तीला चौकशीसाठी गेस्टहाऊसवर आणले असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. काल मुंबईत आल्यानंतर 'सीबीआय' च्या अधिकाऱ्यांनी आपल्या तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, सीबीआयने चौकशीसाठी आणलेली व्यक्ती ही त्याचा स्वयंपाकी (कूक) निरज असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. 

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार चार वरिष्ठ अधिकारी मुंबईत आले आहेत. हे अधिकारी सांताक्रुझ येथे हवाईदलाच्या गेस्ट हाऊसवर वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणीच सकाळी एका व्यक्तीला चौकशीसाठी आणण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, सीबीआय या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथके बनविणार असल्याची माहिती आहे.
Edited  by : Mangesh Mahale     
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com