
Mahatma Gandhi statue unveiled by PM Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान दौऱ्यावर आहेत. जी ७ परिषेदेसाठी पंतप्रधान मोदी जपानमध्ये दाखल झाले आहेत. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्याकडून नरेंद्र मोदींना या परिषदेसाठी आमंत्रित केले गेले होते. मोदींनी किशिदा आज शनिवार २० मे रोजी भेट घेतली. यावेळी हिरोशिमा शहरात मोदींनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. यातून त्यांना जगाला शांती अहिंसेचा संदेश जगाला दिला.
गांधींचा पुतळा अनावरण -
पंतप्रधान मोदी हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करताना म्हणाले की, "हिरोशिमा हे नाव ऐकल्यानंतर आजही जगभरातील लोकांचा थरकाप उडतो. आणि अशा ठिकाणी जी ७ परिषेदेत मला महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी मिळाली. आज जग हवामान बदल आणि दहशतवाद या दोन गोष्टींशी लढा देत आहे.
अशा वेळी हा पुतळा (PM Modi unveils Mahatma Gandhi's in Hiroshima) जगाला अहिंसेचा संदेश देईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. अशावेळी हा गांधींचा पुतळा जगाला शांतीचा संदेश देईल, अशे मोदी म्हणाले.
"हा पुतळा हिरोशिमा शहरात उभारण्यात आला आणि या पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते करण्याची संधी दिली याबद्दल मी जपान सरकारचे विशेष आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे. गांधींनी सांगितलेल्या मार्गावर चालत, अखिल जगाच्या कल्याणासाठी काम करत राहणे, हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली असेल," असे मोदी म्हणाले.
बोधिवृक्षातून मिळणार संदेश :
जपानचे पंतप्रधान हे ज्या वेळी भारत दौऱ्यावर आले, त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना बोधिवृक्ष उपहार म्हणून दिली होता. याच बोधिवृक्षाला हिरोशिमामध्ये रोपण करण्यात आले. याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा आहे. या वृक्षाकडे पाहून लोकांना शांततेचा संदेश मिळेल."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.