फडणवीसांची दमछाक होणार? आणखी एका मित्रपक्षाने सोडला भाजपचा हात

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पक्षाने प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

पणजी : गोव्यामध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Goa Assembly Election) होणार आहे. या निवडणूकीसाठी भाजपचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पक्षाने प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे. पण अजून निवडणूकीचे पडघम वाजण्यापुर्वीच त्यांच्यासाठी गोव्याचा पेपर सोपा नसेल, अशी चिन्ह आहेत. कारण गोव्यात आता आणखी एका मित्र पक्षाने भाजपचा हात सोडून तृणमूलचा हात धरला आहे.

गोव्यात २०१७ साली मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP), महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) आणि ३ अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे हे पक्ष पुन्हा एकदा भाजपसोबत येतील अशी देवेंद्र फडणवीस यांना आशा होती. पण मागच्या काही दिवसांपुर्वीच गोवा फॉरवर्ड पक्षाने काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. तर आता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तृणमूलसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis
थेट संसदेतच भाजप खासदाराच्या हातात दारूच्या बाटलीचा बॉक्स अन् ग्लास (Video)

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (MGP) आज आगामी गोवा विधानसभा निवडणूकीसाठी (Goa Assembly Election) तृणमूल काँग्रेससोबत (Trinamool Congress) निवडणूकपूर्व युती करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी या निर्णयाची या घोषणा करताना सांगितले की, दोन्ही पक्षांनी गोव्यातील जनतेला सुशासन देण्यासाठी हातमिळवणी केली आहे. राज्यात भाजपच्या विरोधात लाट आहे. लोकांना बदल हवा आहे, आणि आम्ही गोव्यात नक्कीच सरकार स्थापन करु.

Devendra Fadnavis
महाआरती करायला निघालेल्या भाजप शहर-जिल्हाध्यक्षाला अटक

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या 3 आणि आणखी १२ अशा एकूण १५ जागांची तृणमूल काँग्रेसकडे मागणी केली आहे आणि मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचा तपशील नंतर ठरवला जाणार आहे. दरम्यान, "तृणमूलने १२ जागांसाठी तत्वतः सहमती दर्शविली आहे. तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी १३ डिसेंबरला गोव्यात येत असून याच भेटीनंतर आम्ही एकत्र युतीची घोषणा करू शकतो," असे ढवळीकर यांनी यावेळी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com