Aaditya Thackeray : चार प्रकल्प महाराष्ट्रातून गेले, आता तरी उदय सामंत राजीनामा देणार का ?

Aaditya Thackeray : "खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरला नाही.
Aaditya Thackeray, Uday Samant
Aaditya Thackeray, Uday Samantsarkarnama

Aaditya Thackeray : 'फॉक्सकॉन-वेदांता'नंतर आता आणखी एक महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूर येथे होणारा C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे. गुजरातमध्ये वडोदऱ्याला हा प्रकल्प होणार असून 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे.

‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला मिळाला आहे. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू व्हावा, हा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असफल ठरला असून, त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.

गुजरातला गेलेल्या या प्रकल्पामुळे राजकारण पेटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले होते. आता टाटा आणि एअरबस या कंपनीचा प्रोजेक्टही गुजरातच्या बडोद्याला गेला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी यांनी हा प्रकल्प राज्यात उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, हा प्रकल्पही गुजरातला गेल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.

ठाकरे गटातील नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टि्वट करीत उद्योगमंत्र्यांवर टीका केली आहे. "खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहिये हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

'टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? असे सवाल ठाकरे यांनी विचारला आहे.

Aaditya Thackeray, Uday Samant
Akhilesh Yadav अडचणीत ; निवडणूक आयोगाची नोटीस, पुरावे सादर करा..

‘वेदान्त-फॉक्सकॉन’प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यानंतर ठाकरे गटानं शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं होते. एअरबस आणि टाटा यांचा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले होते.राजकारणासाठी राजकारण करु नका, असे सावंत यांनी म्हटलं आहे.

‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रात सुरू व्हावा, यासाठी आधी महाविकास आघाडी आणि नंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न केले होते. परंतु, हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याची घोषणा या कंपनीने केली. त्यावेळी ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी महाराष्ट्राला तेवढाच मोठा प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकार मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com