राज्य सरकार अयोध्येमध्ये भव्य 'महाराष्ट्र सदन' बांधणार : आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा

Aditya Thackeray | Sanjay Raut | Ayodhya : शिवसेनेचा अयोध्या दौरा आणि शक्ती प्रदर्शन
Aditya Thackeray Ayodhya Visit latest News
Aditya Thackeray Ayodhya Visit latest NewsTwitter

(Aditya Thackeray Ayodhya Visit latest News)

अयोध्या : महाराष्ट्रातून अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची चांगली सोय व्हावी म्हणून राज्य सरकार इथे १०० खोल्यांचे सुसज्ज महाराष्ट्र सदन बांधणार असल्याची घोषणा पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली. याशिवाय या सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडे जागेची मागणी करणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार असून अधिकृत पत्रव्यवहार देखील करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (Aditya Thackeray Ayodhya Visit latest News)

मंत्री आदित्य ठाकरे शिवसेना (Shivsena) नेत्यांसमवेत अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आदित्य ठाकरे यांच्यासमवेत यावेळी माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, खासदार धैर्यशिल माने आदी उपस्थित होते. (Aditya Thackeray Ayodhya Visit latest News)

आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले, ३ ते ४ वर्षांच्या काळात शिवसेना परिवार चौथ्यांदा अयोध्येमध्ये येत आहोत., मात्र तोच उत्साह आणि उत्सव आहे. २०१८ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत पहिल्यांदा आलो होतो. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की, पहले मंदिर फिर सरकार. त्यानंतर वर्षभरातच न्यायालयाचा निर्णय आला आणि मंदिराला चालना मिळाली. त्यानंतर आम्ही देखील सरकारमध्ये आलो. मात्र आजची यात्रा राजकीय नाही, तर तीर्थयात्रा आहे. आमच्या हातून महाराष्ट्राची सेवा व्हावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना केली असेही ठाकरे म्हणाले. (Aditya Thackeray Ayodhya Visit latest News)

हिंदूत्वावर बोलताना मंत्री ठाकरे म्हणाले, शिवसेनेचे हिंदुत्व स्पष्ट आहे, साफ आहे. रघुकूल रित सदा चली आये, प्राण जाये पर वचन न जाये. जनतेला दिलेली वचन पाळणे आणि ते पूर्ण हेच शिवसेनेचे हिंदूत्व आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आज अयोध्येमध्ये इस्कॉन मंदिराला देखील भेट दिली. माझ्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर इस्कॉन मंदिरला भेट द्यावी म्हणून त्यांचा इमेल आला होता. १९७० च्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्याप्रमाणे मुंबईत इस्कॉन मंदिराला मदत केली होती त्याची आठवण त्यांनी ठेवली आणि त्यांच्याप्रमाणे हे संबंध आपण पुढे न्यावेत ही विनंतीही त्यांनी केली, असे ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com