
पुणे : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) धार जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसला भीषण अपघात झाला आहे. नर्मदा नदीवर बसला अपघात झाल्यानंतर ती खाली कोसळल्याने हा अपघात झाला असून आतापर्यंत त्यात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर पंधऱा प्रवाशांना वाचवण्यात यश मिळाले आहे. अपघातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (MSRTC Accident News)
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेली माहितीनुसार, ही बस जळगांव जिल्हयातील अमळनेर आगाराची होती. इंदूर येथून सकाळी साडे सात वाजता बस सुटली. अमळनेरही ही बस निघालेली असताना नर्मदा नदीवर बसला अपघात झाला. त्यानंतर पुलाचा कठडा तोडून ही बस नदीत कोसळली.
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, धार जिल्हा प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत तेरा जणांचे मृतदेह हाती लागले आहे. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील किती प्रवासी होते, याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही.
एसटी महामंडळाकडून हेल्पलाईन क्रमांक लवकरच सुरू करणार आहोत. मध्य प्रदेश सीमेवरील महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत, असं चन्ने यांनी सांगितली. चालक-वाहक यांच्याबाबत माहिती मिळालेली नाही. आम्ही जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहोत, असं चन्न यांनी स्पष्ट केलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.