Balu Dhanorkar,Uddhav Thackeray
Balu Dhanorkar,Uddhav Thackeraysarkarnama

धक्कादायक : ऑक्सिजन अभावी किती मृत्यू ; ठाकरे सरकार म्हणतं, 'माहित नाही'

ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले याची माहिती महाराष्ट्राने दिली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya) यांनी दिली.

नवी दिल्ली : दोन वर्षापासून कोरोनानं जगभर थैमान घातलं आहे, यात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील अनेक राज्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. ऑक्सिजनसाठी प्रशासनाची धावपळ झाली, वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांचा यात मृत्यू झाला.

ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले? याबाबतची चर्चा आज लोकसभेत (Parliament Winter Session 2021) झाली. पण ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले याची माहिती महाराष्ट्राने दिली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya) यांनी दिली. प्रगतीशील महाराष्ट्राने (Uddhav Thackeray) याबाबतची माहिती केंद्र सरकारला पाठविली नाही, म्हणून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले? असा प्रश्न विचारला होता.

लोकसभेत याबाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले, ''१९ राज्यांनी ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले की नाही याची माहिती दिली. उर्वरित राज्यांनी माहिती दिलेली नाही. यात महाराष्ट्र सरकारने देखील ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले की नाही याची माहिती दिलेली नाही,'' पंजाबमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ४ मृत्यूची नोंद झाली आहे.

Balu Dhanorkar,Uddhav Thackeray
नाशिकचं साहित्य संमेलन अध्यक्षांविनाच ; डॉ. नारळीकर ऑनलाईन संवाद साधणार

''आम्ही राज्यांकडे ऑक्सिजनमुळं किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती मागवली होती, असं सांगितलं. फक्त १९ राज्यांनी यााबाबतची माहिती दिली. महाराष्ट्र सरकारनं ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती दिली नाही,'' असे मांडवीय (Mansukh Mandviya) म्हणाले.

''अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दमण दीव, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, ओडिशा, आसाम, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, नागालँड, सिक्कीम त्रिपुरा, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी माहिती दिली, असे त्यांनी सांगितलं.

हर घर दस्तक’

केंद्र सरकारच्या ‘हर घर दस्तक’ या कोरोना लसीकरण मोहिमेची सद्यस्थिती आणि प्रगती यांचा केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव, तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशनचे (एनएचएम) संचालक यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये गुरुवारी आढावा घेतला. ज्या जिल्ह्य़ांतील लोक मोठय़ा संख्येत करोनाच्या पहिल्या मात्रेपासून वंचित राहिले आहेत, असे जिल्हे झायकोव्ह-डी लस देण्यासाठी निश्चित करावे, अशी सूचना भूषण यांनी केल्याचे आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com