महाराष्ट्र, कर्नाटक पाठोपाठ राजस्थान सरकारचा मशिदींवरील भोंग्यांबाबत मोठा निर्णय

Maharashtra| Karnatak| Rajasthan| कर्नाटक पोलिसांनी मशिदींसह राज्यभरातील 300 हून अधिक धार्मिक स्थळांना ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन न करण्याचे निर्देश दिले आहेत.
Ajan dispute in rajasthan
Ajan dispute in rajasthan

नवी दिल्ली: महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकनंतर (Karnatak) धार्मिक संस्थांकडून लाऊडस्पीकरच्या वापरावरून वाद आता राजस्थानपर्यंत पोहोचला आहे. अजमेर जिल्हा प्रशासनाने गुरुवार (७ एप्रिल) सर्व सार्वजनिक आणि धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. (Ajan dispute in rajastan latest news)

राजस्थान ध्वनी नियंत्रण कायदा, 1963 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) 2005 च्या आदेशाचा दाखला देत, नोटीसमध्ये "सार्वजनिक आणि धार्मिक ठिकाणी शांतता राखण्यासाठी" लाउडस्पीकर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. "ध्वनी प्रदूषणामुळे होणारा अडथळा आणि अस्वस्थतेचा धोका टाळण्यासाठी असे करणे आवश्यक आणि हितकारक आहे," असे आदेशात नमूद केले आहे.

Ajan dispute in rajasthan
राज ठाकरेंनंतर मोहित कंबोज यांचेही मशिदींवरील भोग्यांकडे बोट

राजस्थान सरकारच्या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्ती किंवा समूहाला कोणत्याही धार्मिक किंवा अन्य कार्यक्रमासाठी डीजेचा वापर करायचा असेल, तर त्याला प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मिळणार नाही.

तर दुसरीकडे भाजपने सरकारच्या या निर्णयावर टिका केली आहे. माजी शिक्षण राज्यमंत्री आणि अजमेर उत्तरचे भाजप आमदार वासुदेव देवनानी यांनी प्रशासनाचा हा आदेश तुघलकी आदेश असल्याचे सांगत काँग्रेस सरकार आपले अपयश लपवण्यासाठी असे आदेश जारी करत असल्याचे म्हटले आहे. सरकार कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने काम करण्यास अपयशी ठरत आहे, म्हणून ते लोकांना भडकावू इच्छित आहे. आज राजस्थान सरकार औरंगजेबाच्या तुघलकी फर्मानाप्रमाणेच आदेश जारी करत आहे. अशी टिकाही देवनानी यांनी केली आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्रात काय घडले

कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी मशिदींसह राज्यभरातील 300 हून अधिक धार्मिक स्थळांना ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन न करण्याचे निर्देश दिले आहेत. अजानसाठी निर्धारित डेसिबल स्तरावरच लाऊडस्पीकर वापरावेत अशा सूचना दिल्या आहेत.पोलिसांनी मशिदी, मंदिरे, चर्चसह 300 हून अधिक आस्थापनांना निर्धारित डेसिबल पातळीमध्ये लाऊडस्पीकर वापरण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत.

तर महाराष्ट्रातही आम्ही कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेच्या विरोधात नाही. अजान व्हायला हवी परंतु अनधिकृत लाऊडस्पीकर वर नको. अनधिकृत लाऊडस्पीकर काढावे हे वारंवार कोर्टाने पण सांगितले आहे. यावर पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी कारवाई करावी आणि हे लाऊडस्पीकर काढावे, अशी मागणी भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com