maharashtra human right commission gives clean chit to mumbai police and cooper hospital | Sarkarnama

मोठी बातमी : मानवी हक्क आयोगाची सुशांतप्रकरणी मुंबई पोलिसांसह कूपर हॉस्पिटलला 'क्लिनचिट'

वृत्तसंस्था
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास तीन केंद्रीय यंत्रणा करीत आहेत. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असतानाच मानवी हक्क आयोगाने रियाला दिलासा दिला आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह पाहण्यासाठी रिया चक्रवर्ती मुंबई महापालिकेच्या डॉ. आर.एन.कूपर रुग्णालयाच्या शवागारात गेली होती, असा दावा करण्यात आला होता. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. तसेच, तिने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल, असा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने मुंबई पोलिसांसह कूपर हॉस्पिटलला 'क्लिनचिट' दिली आहे. यामुळे रियावर आरोप करणारे आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.  

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला होता. सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदनही त्यावेळी झालेले नव्हते. मात्र, मुंबई पोलीस आणि कूपर हॉस्पिटलने रिया चक्रवर्ती हिला शवागारात जाऊन सुशांतचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली होती, असा आरोप करण्यात आला होता. यावरुन आता मोठा गदारोळ उडाला होता. रियाने तेथे जाऊन पुरावे नष्ट केले असतील, असा आरोपही होत होता. याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली होती. आयोगाने मुंबई पोलिसांसह कूपर हॉस्पिटलला नोटीस बजावून या प्रकरणी खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. 

कूपरचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर यांनी मानवी हक्क आयोगाच्या कार्यालयात नुकतीच चौकशीला सामोरे जाण्यासाठी आज हजेरी लावली होती. त्या वेळी त्यांना आयोगाला या प्रकरणी माहिती दिली. ते म्हणाले होते की, सुशांतचे शवविच्छेदन सुरू असताना रियाला शवागारात जाण्याची परवानगी दिली होती. याचबरोबर रिया शवागारात गेल्याची घटना घडलेली नाही. 

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणी आदेश दिला आहे. आयोगाने आदेशात म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांतील वृत्त पाहून आम्ही या प्रकरणाची तपासणी केली. मात्र, यात कूपर रुग्णालय आणि मुंबई पोलिसांच्या वतीने नियमांचे उल्लंघन झालेले नाही. 

यामुळे रिया ही शवागारात गेल्याचा आरोप करणाऱ्यांबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. राजपूत करनी सेना आणि सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी या प्रकरणी आरोप केले होते. कूपर रुग्णालयाकडून याचा इन्कार करण्यात आला आहे. याचवेळी असा आरोप करणारेच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख