उद्धव ठाकरेंच्या एका फोनवर मोदींकडून मिळू शकला असता 'ग्रीन सिग्नल'!

राज्य सरकारने मुख्य सचिव सीताराम कुंटेंना मुदतवाढ देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.
Narendra Modi & Uddhav Thackeray
Narendra Modi & Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : राज्य सरकारचे (Maharashtra Government) मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांचा कार्यकाळ आज (ता.30) संपला आहे. राज्य सरकारने कुंटेंना मुदतवाढ देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने ती स्वीकारली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला असता तर ही मुदतवाढ मिळाली असती, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.

याबाबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने वेगळाच दावा केला आहे. कुंटे यांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलावे लागले असते. यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विभागाकडून कुंटे यांच्या मुदतवाढीवर निर्णय घेतला असता, असे या नेत्याने म्हटले आहे. दरम्यान, कुंटे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चांगले काम केल्याने त्यांना मुदतवाढ द्यावी, अशी शिफारस राज्य सरकारने केली होती.

Narendra Modi & Uddhav Thackeray
जिवाच्या भीतीने कंगनाने घेतली पोलिसांकडे धाव

राज्य सरकारने 28 फेब्रुवारीला कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. कुंटे यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कुंटे यांच्या आधी मुख्य सचिव असलेले संजयकुमार यांना निवृत्तीनंतर महावितरण नियामक आयोगावर नियुक्त करण्यात आले होते. परंतु, सध्या कोणतेही महामंडळ रिक्त नसल्याने कुंटे यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण फेब्रुवारी अखेर सेवा हक्क विभागाचे मुख्य आयुक्त प्रमुख स्वाधीन क्षत्रीय निवृत्त होत आहेत. परंतु, कुंटे यांना मुदतवाढ देऊन राज्य सरकारने हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना अद्याप केंद्र सरकारकडून मुदतवाढ मिळालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Narendra Modi & Uddhav Thackeray
होय, 'एनआयए'ने माझा 28 दिवस छळ केला! वाझेचा धक्कादायक कबुलीजबाब

कुंटे हे आधी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून गृह विभागात कार्यरत होते. 1985 च्या बॅचचे आयएएस असलेले कुंटे यांना मुख्य सचिवरपदाचा आतापर्यंत नऊ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला आहे. त्यांनी पुण्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी, धुळ्याचे जिल्हाधिकारी, मुंबई महापालिकेत उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त या तीनही पदांवर काम केले. तसेच गृहनिर्माण विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. संजयकुमार यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्तीच्या वेळीच कुंटे यांचेही नाव चर्चेत होते. संजयकुमार हे त्यांना वरिष्ठ असल्याने कुंटे यांचे नाव मागे पडले होते. कुंटे यांच्या नावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा पाठिंबा होता मात्र, राष्ट्रवादीचा त्यांना विरोध होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मर्जीतील कुंटेंची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com